मित्रांनो राज्यात जास्तीत जास्त नागरिकांना घरकुल मिळावे तसेच प्रत्येकाला स्वतःची हक्काचे पक्के घर मिळावे या दृष्टीने राज्य व केंद्र वेळोवेळी प्रयत्न करून वेगवेगळ्या घरकुल योजना सुरू करत असते. केंद्र शासनाच्या मार्फत संपूर्ण देशभरात प्रधानमंत्री आवास योजना सुरू असून राज्य शासन देखील त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या जातींच्या लोकांसाठी वेगवेगळ्या घरकुल योजना राबवित असते. आपल्या महाराष्ट्र राज्यात 93 हजार 288 नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार असून हे Awas Yojana Maharashtra कोणत्या लोकांना मिळणार आहे. यासंदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील घरकुल वितरणाच्या प्रक्रियेला वेग यावा तसेच राज्यात ज्या लोकांकडे स्वतःचे हक्काचे पक्के घर नाहीत अशा लोकांना 2024 पूर्वी स्वतःचे पक्के घर उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या Gharkul Yojana अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या घरांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली असून पुढील वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत 93 हजार 288 नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे.
93 हजार 288 घरकुल कुणाला मिळणार?
1. राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजना अंतर्गत हे घर वितरित करण्यात येणार आहे.
2. वार्षिक एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांनाच हे घर मिळणार आहे.
3. केवळ आदिवासी कुटुंबांना या घरकुलांची वितरण करण्यात येणार आहे.
वरील लाभार्थ्यांना राज्य शासन लवकरच 93 हजार 288 घरकुल वितरित करणार आहे.
93288 घरकुल मंजुरीचा शासन निर्णय जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत घरकुलांच्या उद्दिष्ट मध्ये वाढ करण्यात आलेली असून समाजातील जास्तीत जास्त बांधवांना घरकुल मिळावे या दृष्टीने घरकुलाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने या gharkul yojana अंतर्गत घरकुल वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर केलेला आहे. ते तुम्ही खाली लिंक करून चेक करू शकतात.
शबरी घरकुल योजना कधी सुरू झाली?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी शबरी आदिवासी घरकुल योजना ही सन 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. राज्यात आदिवासी समाजातील जास्तीत जास्त कुटुंबे ही पक्क्या घरामध्ये राहत नसून ते कच्च्या घरात राहतात. तसेच अनेक लोकही झोपड्या मध्ये राहताना आढळून आलेली आहे त्यामुळे या समाजातील लोकांना इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी तसेच पक्के हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केलेली आहे.
सन 2023 मध्ये पूर्वीच्या आणि यावर्षीचा नवीन लक्षांक ठरवून एकूण 93 हजार नवीन घरकुलांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत या शबरी घरकुल योजना अंतर्गत तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या पुढील यादीमध्ये जर तुमचे नाव आले तर तुम्ही सुद्धा या awas yojna अंतर्गत घरकुल मिळवू शकतात. या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांकरिता पाच टक्के आरक्षण असून उर्वरित कोटा स्पेशल आदिवासी बांधवांकरिता आहे.
अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये शबरी घरकुल योजना संदर्भातील एक छोटीशी व महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे. योजने संदर्भात विस्तृत माहिती जसे की अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे या माहितीकरिता वरील लिंक वरून संपूर्ण डिटेल चेक करू शकतात.