अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! या जिल्ह्यांना मोठा फटका | Avkali Paus Ativrushti Nuksan

शेतकरी बांधवांनो रब्बी पिकं काढणीला येत असतानाच शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचे मोठ्या प्रमाणात संकट उभा राहिलेला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत असून अनेक शेतकऱ्यांच्या रद्दी पिकातील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे सर्व जिल्ह्यातील गहू तसेच हरभरा व कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

 

शेतकरी बांधवांनो कालपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आणि गारपीट सुरू झालेली आहे. राज्यातील नाशिक या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला असून जिल्ह्यातील जवळपास 2600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी Avkali Paus मुळे सर्वच नष्ट झाल्याची खंत व्यक्त केलेली आहे.

 

 

राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळांच तसेच गारपिटीचा अस्मानी संकट कोसळलेला आहे. राज्यातील नाशिक आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असल्याची सध्या माहिती समोर येत आहे. पालघर तसेच बुलढाणा व धुळे या जिल्ह्यांना सुद्धा फटका बसलेला आहे. हे अवकाळी पाऊस राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आता पसरत असून पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे. राज्यातील पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम तसेच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे. तसेच काल मोठ्या प्रमाणात बीड या जिल्ह्यामध्ये Garpit झालेली होती.

 

 

खालील पिकांना बसला मोठा फटका

राज्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा तसेच गहू, आंबा, द्राक्ष व कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे त्याचबरोबर गारपीट यांचा फटका बसत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काढणी लवकरात लवकर करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिकांची काढणी करून ठेवलेली असेल तर ते व्यवस्थित रित्या झाकून ठेवावे. तसेच पावसाचे वातावरण जाईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पिकांची कापणी न करण्याच्या सूचना दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार अनुदान 31 मार्च पूर्वी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात; सविस्तर माहिती पहा

 

पंचनामे करण्याचे आदेश जाहीर

ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत Nuksan Bharpai चे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे.

शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा! 136 कोटी रब्बी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर

पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून शेतकरी बांधवांनी वेळेत सावध होऊन त्यांच्या शेती पिकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेतकऱ्यांवर आलेले हे संकट अतिशय बिकट असून या परिस्थितीत बळीराजाला सावरण्याची गरज आहे. होळीच्या या सणावर शेतकऱ्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून होळीच्या दिवशी ज्या गव्हाच्या पीठाने पुरणाच्या पोळ्या करण्यात येतात ते गव्हाचे पीक सुद्धा नष्ट झालेले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!