अतिवृष्टी नुकसान भरपाई चे उर्वरित पैसे 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा | Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे. राज्यामध्ये 2022 मधील जून ते ऑक्टोबर या महिन्यात अनेक वेळा सततचा पाऊस झाला होता, तसेच मोठ्या प्रमाणावर Ativrushti Nuksan Bharpai झालेली होती. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यानंतर राज्य शासनाने अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निधी जाहीर केला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा झालेले असून बऱ्याच ठिकाणी केवळ 50 टक्के रक्कम वितरित झालेली आहे. त्यामुळे Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2023 उर्वरित रक्कम 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली असून अजूनही राज्यातील अनेक शेतकरी असे आहेत त्यांच्यापर्यंत अजूनही शासनाच्या मार्फत वितरित केलेले नुकसान भरपाई चे पैसे पोचलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तसेच पूर्वीची बाकी अजून देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 31 मार्चपूर्वी अतिवृष्टी Nuksan Bharpai 2023 ची रक्कम वितरित करण्याची महत्त्वपूर्ण अशी घोषणा विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे.

 

आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 6000 कोटी रुपये वाटप

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 6 हजार कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती दिलेली आहे. तसेच Ativrushti Nuksan Bharpai पोटी नुकत्याच महाराष्ट्र शासनाने 755 कोटी रुपयांचा निधी मंजुरी देऊन वितरित केलेला आहे.

 

त्याचप्रमाणे अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या निधीसाठी एकूण 3 हजार 300 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या एकूण सहा हजार आठशे कोटी रुपयांपैकी सहा हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

उर्वरित शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई वाटप होणार:

राज्याच्या अधिवेशनामध्ये सदस्य प्रकाश सोळंके यांनी सरकारला अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केलेली असून सरकार शेतकऱ्यांची पाठीशी आहे, असे सुद्धा म्हटले आहे. तसेच उर्वरित Ativrushti Nuksan Bharpai पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना 31 मार्च 2023 पूर्वी नुकसान भरपाई वाटप करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

या शेतकऱ्यांना 27 हजार हेक्टरी सरसकट पिक विमा मंजूर; लगेच यादीत आपले नाव चेक करा 

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळणार

अतिवृष्टी नुकसान भरपाई बरोबरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन रकमेची अनुदान लवकरच वाटप करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वितरण केलेल्या असून राज्यातील जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान मिळालेले आहे.

तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान योजनेअंतर्गत लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 13000 ऐवजी 27000 हेक्टरी मदत मिळणार; लगेच आपले नाव पहा

अशा प्रकारची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेली असून आता 31 मार्च पूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!