शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 58 कोटी रुपये जमा | Ativrushti Nuksan Bharpai Anudan

शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये सप्टेंबर 2022 ऑक्टोबर 2022 या महिन्याच्या कालावधी दरम्यान मोठ्या प्रमाणात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पूर्णतः नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वाटप केलेले होते. परंतु राज्यातील काही भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे अद्यापही मिळालेले नसल्यामुळे त्यांच्याकडून भरपाई मिळण्याची वाट पाहण्यात येत होती. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात Ativrushti Nuksan Bharpai चे पैसे जमा करण्यात आलेले असून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे, या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो राज्यात झालेल्या सततचा पाऊस आणि मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून तसेच निधीची तरतूद करून शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला होता. त्यामुळे जिल्हा करिता आवश्यक असणाऱ्या निधीच्या मागणी अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra चे वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

तसेच काही जिल्ह्यांकरिता राज्य शासनाने उशिरा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वाटप करण्याची प्रक्रिया ही संथ गतीने सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते, तसेच बरेच शेतकरी नुकसान भरपाईच्या नीकशात बसत नसताना सुद्धा अशा शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या असल्यामुळे त्यांच्याकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून भरपाईची वाटप केलेले आहे.

 

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले 58 कोटी रुपये?

शेतकरी बांधवांनो राज्यातील परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान Nuksan Bharpai चे वितरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते. परिणामी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत शेतकऱ्यांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती.

 

शेतकऱ्यांना निधीचे वाटप केव्हा झाले?

परभणी जिल्ह्यातील परभणी तसेच सेलू, पाथरी, पूर्णा या तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या मार्फत जिल्हा बँकेच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहे. 16 फेब्रुवारी पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Ativrushti Nuksan Bharpai Nidhi जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेच्या मार्फत देण्यात आलेली आहे.

100 टक्के अनुदानावर मोफत शेत जमीन मिळवण्यासाठी नवीन अर्ज सुरू; भूमिहीन व शेतमजुरांना मोफत शेत जमिनीचे वाटप सुरू

किती शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले?

परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यातील 66 हजार 82 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 58 कोटी 38 लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली असून जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ची मदत वितरण करण्याचा शासन निर्णय हा डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Nuksan Bharpai च्या वाटपासाठी 76 कोटी रुपये रक्कम मंजूर केलेली होती.

 

या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 13600 रुपये रक्कम मंजूर; पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

 

तालुका निहाय वितरित रक्कम:

1. परभणी तालुका – 27.94 कोटी रुपये

2. सेलू – 3.19 कोटी रुपये

3. पाथरी तालुका- 8.53 कोटी

4. पूर्णा- 18.70 कोटी

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे उर्वरित पैसे 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

वरील प्रमाणे चार तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाटप करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!