फहवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, त्याचप्रमाणे पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा पिकाचा घास येऊन सुद्धा परत जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप जास्त प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे.
त्याचप्रमाणे हवामान विभागाने सुद्धा दोन-चार दिवसाआधी असा अलर्ट बजावलेला होता की पाऊस येणार आहे, आता उभे असलेले गव्हाचे पीक तसेच हरभरा ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झालेले आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान बघवल्या जात नाही. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची व त्यांच्या मेहनतीचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. हवामान विभागातर्फे कळविण्यात आले होते की येत्या दोन-तीन दिवसात पाऊस येणार होता, आणि तो आला सुद्धा परंतु आता शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी पुढे बघा.
शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले पाहून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयात सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करा.
या जिल्ह्यामध्ये झाले पावसामुळे नुकसान:
राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झालेली आहे त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तात्काळ निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेली आहे. त्यामधील काही जिल्हे म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये पिकाचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले असून त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये शेतकऱ्यांची पिके जमीन दोस्त झालेली आहे हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणाचा फटका बसल्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला याबाबत कृषीमंत्री Abdul Sattar यांनी आदेश दिलेले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी दिले तात्काळ आदेश:
शेतकऱ्यांची स्थिती बघून व त्यांच्या मालाची अवस्था बघून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही प्रमाणात आदेश दिलेले आहे, त्यात त्यांनी जाहीर केले आहे की जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भर पाहिजे आधी सुद्धा देण्यात आलेली आहे. अशी शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.