मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून आपण आपल्या गावामध्ये गावातील नागरिकांना ऑनलाइन सुविधा पुरवून चांगले उत्पन्न मिळवू शकतो. आपले सरकार सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वितरित करण्यात येत असतात. आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू आयडी असते. आपण आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना तहसील संदर्भातील सर्व कामे करून देऊ शकतात. आपले सरकार सेवा केंद्र ची नवीन जाहिरात निघालेली असून कोणत्या जिल्ह्याकरिता Apale Sarkar Seva Seva Kendra करिता अर्ज करता येणार आहे. या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या जिल्ह्याकरिता अर्ज सुरू?
जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, जिल्हा सेतू समिती नागपूर यांच्यामार्फत आपले सरकार सेवा केंद्र ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर हे आपले सरकार सेवा केंद्र जाहिराती संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये रिक्त Apale Sarkar Seva Kendra करीत अधिकृत जाहिरात निघालेली असून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना रिक्त जागांचा तपशील जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईटवरून पाहायचा आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी कोण अर्ज करू शकतो? Who can apply to get Apale Sarkar Seva Kendra?
आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा सेतू समिती नागपूर यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार जिल्ह्यातील सीएससी केंद्र csc centre चालक अर्जदार तसेच ज्यांच्याकडे csc id नाही असे सुद्धा अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज करण्याचा कालावधी:
Apale Sarkar Seva Kendra Nagpur अंतर्गत जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना 6 मार्च 2023 पासून 31 मार्च 2023 पर्यंत या कालावधीमध्ये करता येणार आहे. अर्ज करण्याची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत असणार आहे.
आपले सरकार सेवा केंद्र अटी व शर्ती तसेच अर्जाचा pdf आणि उपलब्ध जागांचा तपशील येथे पहा
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज कसा व कुठे करायचा? How to Apply For Apale Sarkar Seva Kendra?
आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, जिल्हा सेतू समिती नागपूर या ठिकाणी जमा करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज हा अचूक पद्धतीने स्वतः हजर राहून जमा करावा लागेल.
आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? ते येथे पहा
उमेदवारांकडून केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज किंवा ईमेल द्वारे अर्ज किंवा आवक जावक पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. याची सदर उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आपले सरकार सेवा केंद्र अटी व शर्ती तसेच अर्जाचा pdf आणि उपलब्ध जागांचा तपशील येथे पहा