नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सुरू झालेली आहे. या अंगणवाडी भरती अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वाची संधी चालून आलेली आहे. आपण मागील पोस्टमध्ये या भरती संदर्भातील सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता आणि थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. या लेखात अंगणवाडी सेविका भरतीचा अर्जाचा नमुना तसेच उपलब्ध जागांचा तपशील व अर्ज प्रक्रिया या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नाशिक जिल्हा अंगणवाडी भरती सुरू
महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती सुरू झालेली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन प्रकारच्या विविध रिक्त जागांसाठी भरती आयोजित झालेली आहे.
अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या तारखा
नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती अंतर्गत सदर उमेदवारांना 9 मार्च 2023 पासून 23 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
नाशिक अंगणवाडी सेविका भरती जाहिरात, अर्जाचा नमुना व उपलब्ध जागेचा तपशील
नाशिक जिल्हा अंगणवाडी भरती अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या पीडीएफ मध्ये भरती प्रक्रिया संदर्भात विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यामुळे खालील लिंक वरून तुम्ही ते पाहू शकतात. तुम्हाला जर जाहिरात पाहिजे असेल तर जाहिरात वर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात तसेच जागेचा तपशील आणि अर्ज पीडीएफ नमुना सुद्धा खाली दिलेला आहे.
वरील लिंक वरून तुम्ही भरती प्रक्रिया संदर्भातील अर्जाचा नमुना तसेच अधिकृत जाहिरात पीडीएफ आणि उपलब्ध जागेचा तपशील चेक करू शकतात.
आपले सरकार सेवा केंद्र नागपूर अर्ज सुरू; लगेच करा अर्ज, या ठिकाणी आहे रिक्त जागा