महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागा मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यात अंगणवाडी मध्ये मदतनिसांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यात ही अंगणवाडी सेविका भरती राबविण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित झालेल्या असून Anganwadi Sevika Madatnis Bharti 2023 संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व सटाणा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदांसाठी अंगणवाडी सेविका ला 8325 रुपये प्रति महिना तर मदतनीस ला 4425 रुपये प्रति महिना अशा एकत्रित मानधन तत्वावर सरळ नियुक्तीने भरती करण्यात येत आहे. Anganwadi Sevika Madatnis Bharti ही 2022 23 करिता नाशिक जिल्ह्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे.
अंगणवाडी सेविका भरती नाशिक अर्ज करण्याची तारीख
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व सटाणा मधील महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या नाशिक अंगणवाडी सेविका भरती अंतर्गत 9 मार्च 2023 पासून अर्ज सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 मार्च 2023 असणार आहे.
अंगणवाडी मदतनीस कामाचे स्वरूप अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, पिण्याचे पाणि भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीत | बोलावणे, अंगणवाडी सेविकांचे निर्देशाप्रमाणे कामे पार पाडणे इत्यादी.
अंगणवाडी सेविका भरती अटी, शर्ती व पात्रता Anganwadi Sevika Recruitment 2023
1. Anganwadi Sevika Recruitment अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा किमान बारावी पास असावा.
2. बारावी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेला असेल तर सदर अर्जदाराने त्या शिक्षणासंदर्भातील सर्व शैक्षणिक कागदपत्रे व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्या.
3. अर्ज करणारा अर्जदार हा स्थानिक रहिवासी असायला पाहिजे. म्हणजेच अर्जदार च्या शहरांमध्ये अंगणवाडी सेविका भरती अंतर्गत अर्ज करणार आहे त्याच शहरातील रहिवासी असावा.
4. रहिवासी बाबत पुरावा अर्जदारांनी अर्जासोबत जोडावा.
5. अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे या दरम्यान असावी.
6. जरा अर्ज करणारी अर्जदार महिला विधवा असेल तर त्यांच्याकरिता कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे असेल.
7. अंगणवाडी सेविका भरती अंतर्गत लहान कुटुंबांची अट लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे संबंधित अर्जदाराला दोन अपत्या पेक्षा जास्त अपत्य नसावे.
8. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
9. अर्जदार महिला जर विधवा असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र जोडावे.
10. अर्जदारांनी इयत्ता दहावीची परीक्षा मराठी विषयासह पास केलेल्या असावी
11. अर्जदारांनी त्यांची जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
12. अर्जदाराकडे शासकीय यंत्रणेमधील मदतीने किंवा अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास अशा अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
13. भरती प्रक्रिया संदर्भातील इतर सर्व तपशील तसेच अटी व शर्ती आणि पात्रता सदर अर्जदारांनी अधिकृत जाहिरात पीडीएफ मधून वाचून घ्याव्यात.
अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती नाशिक जिल्हा जाहिरात व अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा