मित्रांनो शेती आणि पशुपालन हे दोन प्रमुख व्यवसाय असून या दोन व्यवसायावर अनेक गोष्टी निर्भर आहेत. शेती या व्यवसायामुळे संपूर्ण जग आज चालत आहे. तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या दृष्टीने शेती व्यवसाय व त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हे अत्यंत महत्त्वाचा असते. त्यामुळे दरवेळेस पशुपालन आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेळोवेळी सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना तसेच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील करण्यात येते. अशाच प्रकारे केंद्रशासन देशातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालन करणाऱ्या पशुपालकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवते. या Agriculture Scheme ज्याचा लाभ घेऊन शेतकरी स्वतःची आर्थिक प्रगती साधून लाखो रुपये कमवू शकतात.
शेती हा व्यवसाय जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये केला जातो. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी हा शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत असतो. त्यामुळे शासन वेळोवेळी Agriculture Scheme राबवून शेतकऱ्यांना मदत करते. वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून कुक्कुट पालन तसेच एकात्मिक शेती तसेच मधुमक्षिका पालन तसेच सौर पॅनल उभारणारी योजना यांच्याकरिता बजेटमध्ये तरतूद केली जाते. तसेच या Agriculture Yojana बाबी करिता स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
त्यामुळे आपण आजच्या या पोस्टमध्ये केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण योजना बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. योजनांची माहिती खाली दिलेल्या आहे, या तीन योजनांच्या लाभ घेऊन शेतकरी नक्कीच त्यांची आर्थिक प्रगती साधून लखपती होऊ शकतात.
केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांना लखपती बनवणाऱ्या योजना Various schemes of Central Govt
केंद्र शासन पशुपालनाला तसेच शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी खालील महत्त्वाच्या योजना राबवित आहे. या योजना अंतर्गत शेतकरी लाभ मिळवून अनुदानित तत्वावर जनावरांची खरेदी तसेच कुसुम सोलर पंपांची जोडणी व फळ उत्पादन व्यवसाय करू शकतात. आम्ही शेतकऱ्यांनी या तीन गोष्टी केल्या तर शेतकऱ्याला लखपती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
1. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना National Livestock Scheme:
केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी राष्ट्रीय पशुधन अभियान ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून शेळ्या तसेच मेंढ्या तसेच वराह पालन यांच्यासाठी अनुदान उपलब्ध करून देते.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पोल्ट्री फार्म सुरू करणे तसेच नवीन शेळी व मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू करणे तसेच शेळी व मेंढी पालनासाठी शेड तयार करणे कुक्कुटपालनासाठी शेड तयार करणे त्याचबरोबर वराह पालन करणे तसेच जनावरांना चारा आणि धान्य उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या बाबीं करिता लाभ मिळवू शकतात. केंद्र शासनाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी राबवून देणारी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असून 50 लाख रुपये पर्यंत अनुदान अर्जदारांना मिळते.
जर शेतकऱ्यांना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवायचा असेल तर https://dahd.nic.in/national_livestock_mission या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
2. पीएम कुसुम योजना PM Kusum Yojana:
शेतकरी बांधवांनो देशातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध व्हावा या दृष्टीने केंद्र शासनाने पीएम कुसुम योजना सुरू केलेली आहे. देशातील अनेक भागात अजूनही इलेक्ट्रिकची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नैसर्गिक शेतीवर अवलंबून राहावे लागते. जर शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिली नाही तर कोणत्याही प्रकारची पीक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येत नाही त्यामुळे उजेडाचे पीक घेण्यासाठी गरिबांना पीएम कुसुम योजना अंतर्गत 60 टक्के पर्यंत अनुदान सौर कृषी पंप बसवण्यासाठी देण्यात येते.
एक वेळ शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये कुसुम सोलार पंप बसवल्यास त्यांना विजेची गरज भासणार नाही परिणामी डिझेल पंप सुद्धा आवश्यकता भासणार नाही त्यामुळे सिंचन करण्यासाठी येणारा खर्च कमी होईल परिणामी शेतकऱ्यांची उत्पन्न अनेक पटीने वाढेल.
3. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना
शेतकरी पारंपारिक शेती करत असतात त्यामुळे नवनवीन पिके तसेच फळ पिके घेऊ शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही. पारंपारिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात घाम गाळून मेहनत करून देखील फळ शेती एवढा तसेच भाजीपाला शेती एवढा उत्पन्न त्यांना मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच अनुदान आणि कर्ज सुद्धा दिले जाते. या माध्यमातून शेतकरी ग्रीन हाऊस तसेच पॉलिहाऊस यांची निर्मिती करू शकतात. तसेच भाजीपाला पिके आणि फळ पिके घेऊन स्वतःला लखपती आणि समृद्ध बनवू शकतात.