महाराष्ट्र शासनाच्या मार्फत 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना रेशन धान्याऐवजी पैसे वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरिताच योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावा लागतो. रेशन धान्य ऐवजी पैसे मिळवण्यासाठी चा अर्ज कसा करायचा? तसेच कोणत्या 14 जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांना रेशन धान्य एवजी पैसे मिळणार व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या योजने संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय या Ration Card Maharashtra Update संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रेशन धान्य एवजी पैसे देणारी योजना काय आहे?
रेशन कार्डधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यात यापूर्वी 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दोन रुपये किलो प्रमाणे गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात येत होते. परंतु अनेक दिवसांपासून ही योजना बंद केलेली आहे. ही योजना बंद केलेली असल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना राशन धान्य मिळणे बंद झालेले आहे. त्यामुळे वारंवार अशा रेशन कार्ड धारकांकडून शासनाने ही Ration Card Yojana Maharashtra नव्याने सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता अशा रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य एवजी थेट पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ही योजना आता राज्यात सुरू झालेली असून महाराष्ट्र शासनाने या योजनेसंदर्भात विस्तृत शासन निर्णय प्रकाशित करून योजना राबविण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तसेच योजनेचे अर्ज सुरू झालेले असून या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून जमा करायचे आहेत. 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना मिळेल रेशन धान्य ऐवजी पैसे त्याची यादी येथे पहा
रेशन कार्डधारकांना रेशन धान्य ऐवजी किती रुपये मिळणार?
जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रेशन धान्य ऐवजी पैसे वितरित करणाऱ्या या योजनेअंतर्गत अर्ज केला तर धन्य ऐवजी पैसे मिळण्यास पात्र ठराल. आता ज्या रेशन धारकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला त्या रेशन धारकांना जर एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असतील तर एका व्यक्तीला दीडशे रुपये एका महिन्याला मिळतील. म्हणजे त्या पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबाला एका महिन्याला 750 रुपये मिळतील. तसेच या योजनेअंतर्गत वर्षाचा हिशोब काडल्यास 9000 रुपये एका वर्षाला मिळतील.
वरील लिंक करून तुम्ही रेशन धान्य ऐवजी पैसे मिळवण्याचा अर्ज तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून पाहू शकतात. अर्ज तुम्हाला व्यवस्थितपणे भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून जमा करावा लागेल.
योजने अंतर्गत रेशन धान्य चे पैसे कसे मिळणार?
रेशन कार्ड धारकांना जर तुम्ही या योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी अर्ज केला तर तुम्हाला अर्ज करताना कुटुंबातील महिलेचे आधार संलग्न बँक खाते द्यावे लागेल. योजनेचे सर्व पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्यामुळे महिलेची बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे.
रेशन धान्य एवजी पैसे वितरित करणाऱ्या महत्वाच्या योजने संदर्भात थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये आणून घेतलेली आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे हवे असतील तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.