शेतकरी बांधवांना नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर प्राप्त झालेली आहे. राज्यात सुरू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जे शेतकरी त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे बँकेकडे कर्ज परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत 31 मार्च 2023 पूर्वी 50000 प्रोत्साहन रकमेची वितरण करण्यात येणार आहे. 50000 अनुदान योजने संदर्भात महत्त्वाचा अपडेट प्राप्त झालेलं आहे.
मित्रांनो 50000 Anudan Yojana Maharashtra अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी जे पन्नास हजार प्रोत्साहन मिळवण्यास पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. शेतकरी बांधवांना आतापर्यंत नियमित कर्जमाफी योजना अंतर्गत 50000 अनुदान योजनेच्या सर्व जिल्ह्यांच्या 3 याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामुळे नेहमीच कर्जमाफी 50 हजार प्रोत्साहन योजनेच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असल्यामुळे प्रोत्साहन म्हणून 50000 अनुदानाची राशी प्रदान करत आहे.
यादीत नाव असून सुद्धा अनेकांना 50 हजार मिळाले नाही:
50 Hajar Anudan योजना अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या याद्या मध्ये अनेक शेतकऱ्यांचा समावेश असून अजून पर्यंत अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेली नाही. त्यामुळे पन्नास हजारांना मिळण्याच्या यादीत नाव आलेली अशी अनेक शेतकरी आहेत जे 50000 Anudan खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत पन्नास हजार अनुदान खात्यात ना जमा झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रक्कम जमा करण्याची घोषणा केलेली आहे.
50 हजार अनुदान 31 मार्च पूर्वी जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा:
नियमित कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तसेच अजूनही 50000 Anudan रकमेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम केव्हा वितरित करणार, असा प्रश्न अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलेला होता. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून 31 मार्च 2023 पूर्वी प्रत्येक पन्नास हजार अनुदान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची घोषणा केलेली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान
शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना 31 मार्च 2023 पूर्वी पन्नास हजार प्रोत्साहन वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनुसार राज्यात राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 18 तसेच सन 2018 ते 19 आणि सन 2019 ते 20 या तीन वर्षाचा कालावधी पैकी किमान दोन वर्षे ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड केलेली आहे. अशाच शेतकऱ्यांना 50000 Protsahan लाभ देण्यात येणार आहे.
पन्नास हजार अनुदानाची पुढील यादी केव्हा येणार?
शेतकरी बांधवांनो 50000 अनुदान योजने अंतर्गत आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या तीन याद्या प्रकाशित झालेल्या असून अनेक शेतकरी पन्नास हजारांना योजनेअंतर्गत पात्र आहेत परंतु त्यांची यादीमध्ये नाव आलेली नाहीत. त्यामुळे अशी शेतकरी 50000 अनुदान योजनेची पुढील यादी केव्हा येणार याच्या प्रतीक्षेत आहेत. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार 50000 Anudan Yojana Maharashtra ची पुढील यादी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे.
या शेतकऱ्यांना 27 हजार हेक्टरी सरसकट पिक विमा मंजूर; लगेच यादीत आपले नाव चेक करा
शेतकऱ्यांना 4700 कोटी रुपये वाटप:
शेतकरी बांधवांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराच्या प्रोत्साहन रकमेसाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 4700 कोटी रुपये वाटप केलेले आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच 31 मार्च पूर्वी 50000 वितरित करण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे.