50000 अनुदान येत्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; 140 कोटी निधी मंजूर, महत्वाचा निर्णय | 50000 Anudan Yojana Maharashtra Update

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50000 अनुदानाची प्रोत्साहनाची रक्कम वितरित करण्यात येणार असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पन्नास हजार प्रोत्सानाची रक्कम जमा करण्यासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आजच्या लेखात आपण 41 कोटी नियमित कर्जमाफी प्रोत्साहन रकमेच्या 50000 Anudan Yojana वितरणा संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 

140 कोटी 70 लाख रुपये निधी मंजूर 50000 Anudan Maharashtra

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे 50000 Anudan Yojana च्या विविध याद्यांमध्ये आलेली असून अजूनही राज्यातील अशी अनेक शेतकरी आहेत ज्यांची नावे आलेली आहे तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधाकांकडून या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच राज्य शासनाने देखील राज्यातील Niyamit Karj Paratfed करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पन्नास हजाराच्या रकमेची वितरण करण्यासाठी अधिकृत घोषणा केलेली होती.

 

त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढून 140 कोटी 70 लाख इतका निधी पन्नास हजार अनुदान वितरित करण्यासाठी मंजूर केलेला आहे. या Niyamit Karj Mafi Yojana संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय देखील शासनाने प्रकाशित केलेला असून त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

140 कोटी वितरणाचा शासन निर्णय जाहीर

शेतकरी बांधवांनो Niyamit Karj Mafi Yojana अंतर्गत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन रकमेची वितरण तात्काळ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे. शासन निर्णय डाऊनलोड करण्याचे लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

140 कोटी 70 लाख वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

15 दिवसाच्या आत या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार प्रोत्साहन

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी पन्नास हजार प्रोत्साहन रकमेच्या तसेच कर्जमाफी योजनेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत असे सांगण्यात आलेले आहे की येत्या 15 दिवसाच्या आत म्हणजेच 31 मार्च 2023 पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजार प्रोत्साहन रकमेचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना खुशखबर! रब्बी हंगाम पिक विमा वाटपासाठी 36 कोटी रुपये वितरित; या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा 

त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने 140 कोटी रुपयांचा निधी देखील वितरित केल्यामुळे आता 31 मार्च च्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

50000 अनुदान योजनेच्या यादीत आपले नाव आले का, ते असे चेक करा

Leave a Comment

error: Content is protected !!