शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती. नियमित कर्ज माफी या घटकांतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 50000 प्रोत्साहन रकमेचा अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने जे शेतकरी त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत कर्जमाफी योजनेच्या तीन याद्या प्रकाशित झालेल्या होत्या. काल महाराष्ट्र शासनाने नेहमी Karjmafi योजनेच्या उर्वरित यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियमित कर्ज माफी योजना 50 हजार अनुदान योजनेची चौथी यादी जाहीर केलेली आहे.
50000 अनुदान योजनेच्या चौथ्या यादीत नवीन शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून जे शेतकरी आतापर्यंत पात्र असून सुद्धा Mahatma Jyotirav Fule Shetkari Karj Mafi Yojana पन्नास हजार प्रोत्साहन रकमेच्या कोणत्याही यादीमध्ये बसलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांना यादीत समाविष्ट करून लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या नवीन यादी ची प्रतीक्षा करत होते अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून नवीन यादीत नाव आल्यास त्यांना पन्नास हजार मिळणार आहे.
50000 अनुदान योजना 4थी यादी कुठे मिळेल? 50000 Anudan 4th List
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नुकतीच जाहीर करण्यात आलेली 50 हजार अनुदान योजनेची चौथी यादी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर पाहायला मिळेल. परंतु ही Karjmafi Yadi पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्र मध्ये जाऊन पाहता येईल. किंवा ही 50000 Anudan List पाहण्यासाठी तुमच्याकडे सीएससी आयडी असायला हवा. त्यामुळे तुम्ही जवळचे आपले सरकार किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुमच्या आधार कार्ड च्या माध्यमातून ही यादी पाहू शकतात.
या लेखात आम्ही तुम्हाला काही जिल्ह्यांची यादी उपलब्ध करून देणार आहोत. खालील लिंक वरून ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करू शकतात.
50 हजार अनुदान चौथी जिल्हा निहाय यादी जाहीर
शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली Niyamit Karjmafi 50 हजार अनुदान योजनेची चौथी यादी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर पाहायला मिळणार आहे. तसेच आम्ही सुद्धा तुम्हाला या लेखांमध्ये काही जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध करून देणार आहोत. त्यांच्या लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या असून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून ती यादी तुमच्या मोबाईल मध्ये सेव करू शकतात.
यवतमाळ 50000 4थी यादी येथे पहा
दिग्रस 50000 4थी यादी येथे पहा
उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या याद्या लवकरच या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील.