मित्रांनो गावात विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असतात. वेळोवेळी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविते. त्याचबरोबर भूमिहीन व्यक्ती, शेतमजूर, बांधकाम कामगार यांच्याकरिता अनेक प्रकारच्या योजना या राबविण्यात येत असतात. केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्यामार्फत अनेक योजना ऑनलाइन किंवा ऑफलाइन राबविण्यात येतात. परंतु गावातील प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवता येत नाही. गावातील काही हुशार व योजना बद्दल ज्ञान असणारे व्यक्ती अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ मिळतात. त्यामुळे तुमच्या गावांमध्ये कोणत्या व्यक्तीने किती योजनांचा लाभ मिळवलेला आहे. Yojana Online संपूर्ण माहिती आपल्याला चेक करता येते.
मित्रांनो तुमच्या गावांमध्ये राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ आतापर्यंत कोणत्या व्यक्तींनी घेतलेला आहे, त्याची संपूर्ण यादी आपल्याला पाहता येते. मित्रांनो अनेक प्रकारच्या योजना मनरेगा अंतर्गत राबविण्यात येतात. त्यामुळे तुमच्या गावामध्ये विहीर तसेच गाय गोठा व घरकुल योजना तुषार सिंचन व ठिबक सिंचन अशा अनेक योजना चा लाभ आतापर्यंत अनेक व्यक्तींनी घेतलेला असतो.
मित्रांनो गावात असणारे 10 टक्के हुशार व्यक्ती गावात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी 90 टक्के योजनांचा लाभ मिळत असतात. यामध्ये प्रामुख्याने जास्त जमीन असणारे शेतकरी तसेच योजना बद्दल थोडीफार माहिती असणारे शेतकरी जास्त लाभ मिळतात. परंतु जे ओरिजनल शेतकरी असतात जे दिवसभर त्यांच्या शेतात राब राब करून कष्ट करतात. अशा शेतकऱ्यांना मात्र अनेक वेळा योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही एखादी योजना गावांमध्ये राबवली की लगेच त्या योजनेअंतर्गत अर्ज करायला पाहिजे. त्या योजने मधून लाभ मिळवला पाहिजे.
गावात कोणत्या योजनेचा लाभ कोणी मिळवला
मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने विहीर योजना असते. मग त्याच बरोबर घरकुल योजना असते. मित्रांनो विहीर व घरकुल या दोन जास्त अनुदान असणाऱ्या महत्त्वाच्या योजना आहेत. त्यामुळे प्रत्येक जण या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करत असतो.
योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर
मित्रांनो वरील पैकी अनेक प्रकारच्या योजना अंतर्गत ज्या गावातील लाभार्थ्यांनी लाभ मिळालेला आहे. अशा लाभार्थ्यांची यादी आता शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या गावांमध्ये कोणत्या व्यक्तीने किती प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवला हे माहीत होणार आहे.
तुमच्या गावातील योजनांची यादी आणि लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गावातील योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची?
मित्रांनो गावा मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांनी विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळालेला आहे याची यादी पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ती यादी पाण्याची प्रोसेस तुम्हाला खालील प्रमाणे पूर्ण करायची आहे.
1. तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला नरेगा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
2. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्या वर्षातील लाभार्थ्यांची यादी पाहिजे आहे. ते वर्ष या ठिकाणी निवडून द्या.
3. आता फायनान्शिअल इयर निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका तुमची ग्रामपंचायत हे निवडायचं आहे.
4. वरील सर्व बाबी व्यवस्थितपणे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शेवटी प्रोसिड नावाच्या पर्याय वर क्लिक करायचा आहे.
5. आता तुम्ही जे गाव निवडला आहे त्या गावातील राबवलेल्या सर्व योजनांची यादी तुम्हाला दिसत असेल.
6. तसेच त्या गावातील कोणत्या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्याला मिळालेला आहे याची सुद्धा माहिती तिथे असेल.
गावात कोणत्या व्यक्तीने कोणत्या योजनेचा लाभ मिळवला ते येथे पहा
मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गावात कोणत्या वर्षी कोणती योजना राबवलेली होती. तसेच त्या योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांनी लाभ मिळवलेला आहे. या संदर्भात विस्तृत माहिती पाहता येते.