अर्थसंकल्प 2023 मध्ये शेतकरी बांधवांसाठी जबरदस्त घोषणा; अनेक योजना, आयकरात सूट व बरच काही! | Union Budget 2023

मित्रांनो आत्ताच देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केलेला आहे. या अर्थसंकल्प 2023 मध्ये शेतकरी बांधवांकरीता अनेक प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत. अनेक योजना शेतकऱ्यांकरिता राबवण्यात येत असून अनेक बाबींमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण Union Budget 2023 मध्ये शेतकरी बांधवांसाठी काय नवीन प्रावधान करण्यात आलेले आहे, या संदर्भात माहिती जाणून घेत आहोत.

 

मित्रांनो अर्थसंकल्प आज दिनांक 01 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्येक जणाला देशाच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांकरिता कोणकोणत्या घोषणा दिलेल्या आहेत. तसेच कोणकोणत्या नवीन योजना या Union Budget 2023 in Marathi अंतर्गत  राबवण्यात येत आहेत. याविषयी उत्सुकता येत असते. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या करिता अर्थसंकल्पात कोणत्या नवीन घोषणा केल्या आहेत, हे जाणून घ्यायचे असते. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांकरिता अनेक प्रकारचे नवीन घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांकरिता करण्यात आलेल्या घोषणा तसेच योजना संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

अर्थसंकल्प 2023 शेतकऱ्यांकरिता केलेल्या घोषणा Budget 2023 Announcements for Farmers

अर्थसंकल्प 2023 मध्ये शेतकऱ्यांकरिता काही विशिष्ट प्राधान्य तसेच नवीन योजना आणि काही बदल करण्यात आलेला आहे ते खालील प्रमाणे आहे.

1. कृषी क्षेत्रामध्ये स्टार्टअप ला असं देण्यासाठी कृषी निधी म्हणजेच डिजिटल एक्सीलरेटर फंड तयार करण्यात येणार आहे.

2. शेतकऱ्यांच्या पूर्वीप्रमाणे कर्जामध्ये सूट मिळत होती, ती आता पुन्हा कायम ठेवण्यात आलेली आहे.

3. शेतकऱ्यांना डिजिटल शेतीशी जोडण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना डिजिटल शेतीची प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

4. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती सोबत जोडण्यासाठी तसेच सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन पंतप्रधान प्रमाण योजना सुरू करण्यात येत आहे.

5. शेतकऱ्यांना आर्थिक वर्षांमध्ये वीस हजार कोटी पर्यंतचे कर्ज वाटप करण्याच उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे.

6. अनेक ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

7. हरित विकासावर सरकार भर देणार आहे.

8. सहकार मॉडेल हे शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत आहे.

9. जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.

10. गोवर्धन योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन 500 प्लांट उभारण्यात येणार आहे.

11. हरित कर्ज कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

12. 10,000 बायो इनपुट रिसर्च सेंटर्स हे हे उभारण्यात येणार असून त्या अंतर्गत नैसर्गिक शेती प्रयोग राबवण्यात येणार आहे.

13. 2200 कोटी रुपयांची मदत ही फळबाग शेती करिता करण्यात येणार आहे. सरकार फळबाग शेती करणाऱ्या वर भर देणार आहे.

14. कृषि प्रोत्साहन निधी ची घोषणा करण्यात आलेली आहे.

15. खारफुटीच्या योजनेला चालना मिस्टी योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.

16. पंतप्रधान मत्स्य योजना करिता पूर्वीचा असणारा निधी आता वाढवण्यात येणार आहे.

 

कुसुम सोलर पंप योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू; 2 लाख सौर कृषी पंप वितरित होणार

 

शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक योजना तसेच विविध घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023(Budget 2023) मध्ये देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या आहेत.

एकंदरीतच बजेटचा विचार करता शेतकऱ्यांकरिता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज वितरण तसेच मत्स्य तसेच नैसर्गिक शेतीला चालना त्याप्रमाणे विविध योजना या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणार आहे.

खरीप पिक विम्याचे 724 कोटी रुपये लवकरच या शेतकऱ्यांना मिळणार; सरसकट पिक विमा मंजूर शासन निर्णय जाहीर

अर्थसंकल्प 2023 संदर्भातील शेतकऱ्यांकरिता महत्त्वाची असणारी ही माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. अर्थसंकल्प 2023 तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की अभिप्राय द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!