रास्त भाव धान्य दुकान म्हणजे रेशन दुकान सुरू करण्यासाठी नवीन अर्ज सुरू; असा मिळवा रेशन वितरणाचा परवाना | Swast Dhanya Dukan Parwana Arj Suru

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मार्फत प्रत्येक गावात तसेच तालुक्याचे ठिकाणी व शहराच्या ठिकाणी देशातील गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी रेशन दुकानांचे परवाने वितरित करण्यात येत असतात. प्रत्येक जिल्ह्याकरिता वेळोवेळी रास्त भाव धान्य दुकान सुरू करण्यासाठी नवीन अर्ज मातविण्यात येत असतात. त्यानंतर Swast Dhanya Dukan Parwana वितरण झालेल्या व्यक्तींना स्वस्त धान्य विकता येते. अशाच प्रकारची नवीन जिल्हा करिता एक अपडेट आलेली आहे, ती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो अमरावती जिल्ह्याकरिता जिल्ह्यातील काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्फत परवाने वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक पात्र व्यक्तींकडून तसेच संस्थांकडून Swast Dhanya Dukan Parwana सुरू करण्याचा परवाना मिळवण्यासाठी नवीन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 

रेशन दुकान परवाना मिळवण्यासाठी कोण अर्ज करू शकतो? Who can apply for ration shop license?

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावांमध्ये रास्त भाव धान्य दुकान म्हणजेच रेशन दुकानाचा परवाना मिळवायचा असेल तर खालील व्यक्ती तसेच संस्थांना अर्ज करता येतो.

1. स्थानिक स्वराज्य संस्था

2. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट

3. सहकारी संस्था (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था)

4. सार्वजनिक संस्था किंवा न्यास

 

वरील सर्वांना रेशन दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. वरील दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार Swast Dhanya Dukan परवाने वितरण करण्यात येत असतात. सर्वात पहिले प्राधान्य हे स्थानिक स्वराज्य संस्था यांना असते.

या जिल्ह्याची आज नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; लगेच यादी पहा व तुमचे नाव चेक करा

रेशन दुकान परवान्यासाठी या जिल्ह्याचे अर्ज सुरू

मित्रांनो राज्यातील अमरावती या जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी परवाने वितरण करण्यात येत आहे. याकरिता जाहीरनामा देखील जिल्हा प्रशासनाच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल तर तुमच्या गावांमध्ये रेशन दुकान मिळवण्यासाठी अर्ज सुरू असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात.

 

रास्त भाव धान्य दुकानासाठी अर्ज कसा व कुठे करायचा?How and where to apply for fair price grain shop?

मित्रांनो जिल्ह्यातील अर्जदारांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये त्यांची अर्ज सादर करायची आहेत. करावयाचा अर्जाचा नमुना संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. त्यामुळे जर तुम्ही जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वरील प्रमाणे अर्ज करावा.

तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेची लॉटरी यादी जाहीर; असे पहा यादीत नाव

अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!