मित्रांनो राज्यात लवकरच दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या एक्झाम सुरू होत आहेत. राज्यात यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. पारदर्शकपणे सर्व परीक्षा पार पडाव्या तसेच कोणत्याही ठिकाणी आमची प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. एकंदरीत दहावी आणि बारावीच्या परीक्षे च्या अंमलबजावणीसाठी कशाप्रकारे बंदोबस्त करण्यात आलेला आहे या SSC HSC Exam Update संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
सेंटरवर पेपर पोहोचविण्यासाठी जीपीएस चा वापर:
मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मार्फत विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी जे सेंटर ठरवून देण्यात आलेले असतात त्या सेंटरवर पेपर पोहोचवण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या गाडीतून हे पेपर सेंटरवर पोहोचवण्यात येतील त्यामध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्राने मुळे SSC HSC Exam Update Maharashtra 2023 मधील पेपर फुटीचा प्रकार टळणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन व अंतिम वेळापत्रक जाहीर; आत्ताच येथे पहा नवीन वेळापत्रक
दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी असा असेल चोख बंदोबस्त:
1. पेपर फुटीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या पूर्वी देण्यात येणारा दहा मिनिटांचा अतिरिक्त टाईम रद्द करून तो आता निर्धारित वेळेनंतर देण्यात येणार आहे.
2. जीपीएस यंत्रणेद्वारे पेपरची पोहोच परीक्षा केंद्रावर करण्यात येणार आहे.
3. परीक्षा केंद्रावरील आजूबाजूच्या परिसरात असणारी झेरॉक्स दुकाने परीक्षेच्या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी बंद ठेवण्यात येणार आहे
4. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पथके निर्माण करण्यात आलेली आहे.
5. कॉपी पकडण्यासाठी शोध मोहीम राबवणारे टीम कार्यान्वित असणार आहे.
6. परीक्षेच्या दरम्यान एखाद्या सेंटरवर गैरप्रकार आढळून आल्यास केंद्रप्रमुखांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहे.
7. पेपर सुरू होण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासून घेण्यात येणार आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेत महत्त्वाचा व मोठा बदल! इथे क्लिक करून जाणून घ्या कोणता बदल करण्यात आला
विद्यार्थ्यांना 10 मिनिट अतिरिक्त वेळ मिळेल:
मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डाने यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांच्या पेपर मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा पेपर फुटीच्या घटना होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या आधी देण्यात येणारा दहा मिनिटाचा अतिरिक्त कालावधी हा रद्द केलेला आहे. परंतु विद्यार्थ्यांना मिळणारे दहा मिनिटे कमी होऊ नये म्हणून आता विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा अतिरिक्त टाईम देण्यात येणार आहे. म्हणजे जर तुमचा पेपर अकरा वाजता सुरू होणार असेल आणि त्याचा शेवट दोन वाजता असेल तर तुम्हाला दोन वाजून दहा वाजेपर्यंत वेळ असणार आहे.