मित्रांनो महावितरणच्या मार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यात महत्वपूर्ण अशी सौर कृषी वाहिनी योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची पडीक व नापीक असणारी शेतजमीन महावितरण ला भाड्याने देऊन निश्चित भाडे मिळवण्याची चांगली संधी आहे. महावितरण शेतकऱ्याचे जमिनीवर सौर प्लांट स्थापन करून शेतकऱ्यांना त्याचे भाडे देणार आहे.
या Solar Krushi Vahini Yojana च्या अंतर्गत उपकेंद्राच्या परिघाजवळ असणारे शेतकरी सहभागी होऊ शकत आहे. त्या जमिनीवर महावितरण सौर वीज निर्मिती प्लांट स्थापन करेल ज्याच्या माध्यमातून जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला दर महिन्याला भाडे देण्यात येईल तसेच वीजपुरवठा सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणारी वीज नैसर्गिक प्रक्रियेच्या आधारे होणार आहे त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा समतोल राहील, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Required Documents For Solar Krushi Vahini Yojana
मित्रांनो या सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड
2. शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
3. शेत जमिनीचा नकाशा
4. शेतकऱ्यांनी नोंदणी केलेले प्रमाणपत्र
5. शेत जमिनीचा खाते उतारा
6. ओळखपत्राची झेरॉक्स प्रत
वरील सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तसेच लाभ मिळण्यासाठी आवश्यक असणार आहे.
अर्ज कसा करायचा?
मित्रांनो महावितरण व राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी ही एक महत्त्वाची योजना सोन्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
1. सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
2. महावितरण ची अधिकृत वेबसाईट आणि अर्ज करण्याची नोंदणी करावयाची वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहे.
3. आता तुम्ही या वेबसाईटच्या होम पेजवर या पुढे तुम्हाला सुविधा नावाचा एक पर्याय दिसेल.
4. या पर्यायावर क्लिक करा
5. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन अशा नावाचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
6. आता तुम्हाला विचारलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे.
7. रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये शेतकऱ्यांनी त्यांची माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे
8. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अर्जासोबतच अपलोड करायची आहे.
9. आता शेतकऱ्यांचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला असेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म येथे पहा
शेतकरी मित्रांनो वरील यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा महावितरण च्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या या सौर कृषी वाहिनी योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करून तो व्यवस्थितपणे भरू शकतात.