सिंचन पाईपलाईन योजने करिता 80 टक्के अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करा | Sinchan Pipeline Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाडीबीटी शेतकरी या राज्य पुरस्कृत शेतकरी योजनांच्या अधिकृत पोर्टलवर शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी पाईपलाईन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येत आहे. जर तुम्ही या Sinchan Pipeline Yojana अंतर्गत अर्ज करू इच्छिणार असाल तर त्याची संपूर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे.

पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे शेत जमीन असायला पाहिजे. जर तुम्ही शेतकरी असाल तर या योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र आहात. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जलसिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना pvc pipe च्या माध्यमातून पाईपलाईन करता येणार आहे. याकरिता खालील प्रमाणे अर्ज करावा.

 

पाईपलाईन योजने करिता अर्ज कसा करायचा? How to Apply for pipeline yojana maharashtra

 

शेतकरी मित्रांनो पाईपलाईन योजना अंतर्गत जर तुम्ही अर्ज करण्याची इच्छुक आणि पात्र असाल तर खालील प्रमाणे अर्ज करावा.

1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी शेतकरी पोर्टलची अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करायची आहे.

2. आता या ठिकाणी जर तुम्ही आधीपासूनच तुमची नोंदणी केलेली असेल तर लॉगिन करा किंवा

3. वैयक्तिक शेतकरी म्हणून सुरुवातीला नोंदणी करून घ्या.

4. तुमची सर्व शेत जमिनीची आणि पिकांची माहिती त्या ठिकाणी प्रविष्ट करा.

5. आता या महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या वेबसाईटवर लॉगिन करा.

6. आता तुम्हाला सिंचन उपकरणे आणि सुविधा हा ऑप्शन दिसेल त्या पर्यावर क्लिक करायचं आहे.

7. आता यामध्ये तुम्हाला Sinchan Pipeline चा ऑप्शन दिसेल त्यामध्ये पाईपलाईन चा अर्ज व्यवस्थितपणे भरा आणि शेवटी सबमिट करा.

8. तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला असेल.

 

अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे पाईपलाईन योजना अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मागणी अर्ज करू शकतो.

 

अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय आहे?

जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT Shetkari Portel पाईपलाईन योजनेअंतर्गत अर्ज केला तर तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो छाननीअंतर्गत या ऑप्शन मध्ये जातो. आता महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजनांची लॉटरी लागल्यानंतर तर तुमची ऑनलाईन सोडतीत निवड झाली तर तुम्हाला एसएमएस प्राप्त होतो.

 

किंवा जर तुम्हाला एसएमएस प्राप्त झाला नाही तर तुम्ही किंवा एसएमएस प्राप्त झाला तरीसुद्धा महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर लॉगिन करून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात. जर त्या ठिकाणी विनर हा ऑप्शन दिसत असेल तर तुमची त्या योजने करिता निवड झालेली आहे असे समजावे.

 

त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून अनुदान मागणी करावी लागते

Leave a Comment

error: Content is protected !!