शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याला हे तरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात 2022 मध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता तसेच प्रचंड पाऊस झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक संपूर्णतः नष्ट झाले होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण Shetkari Nuksan Bharpai संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना Nuksan Bharpai Maharashtra रकमेचे वितरण करण्यासाठी जास्तीत जास्त हेक्टरी 36 हजार रुपये मदत ही 3 हेक्टरच्या मर्यादे पर्यंत वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बरोबरच शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांचा खरिपाचा पिक विमा काढलेला होता, याची सुद्धा रक्कम वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळवण्याकरिता पिक विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. शेतकरी बांधवांची झालेली नुकसान पिक विमा योजनेच्या माध्यमातून भरून काढण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या हिष्याचा निधी देखील वितरित केलेला आहे.
कुसुम सोलर पंप योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू; 2 लाख सौर कृषी पंप वितरित होणार
मित्रांनो राज्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकाटून गेला होता. अनेक शेतकऱ्यांची संपूर्णता शंभर टक्के पीक पावसामुळे नष्ट झाले होते. त्यामुळे राज्यातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात Nuksan Bharpai झालेली होती, अशा ठिकाणी राज्य शासनाने तसेच त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी 25 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्याचे आदेश पीक विमा कंपनी ला दिले होते.
त्याचा अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्य शासनाच्या तर्फे शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये Shetkari Nuksan Bharpai Maharashtra वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे. शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई चा लाभ मिळालेला आहे. काही जिल्ह्यांकरिता राज्य शासनाच्या वतीने नुकताच निधी जाहीर केलेला असून उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना Ativrushti Nuksan Bharpai चे पैसे लवकरच मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ची दुप्पट रक्कम:
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने Nuksan Bharpai च्या वितरणाकरिता दरवर्षी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 6800 रुपये वितरित न करता हेक्टरी 13600 रुपये जिरायत क्षेत्रासाठी तर 23 हजार रुपये बागायत क्षेत्रासाठी आणि बहुवार्षिक पिकांकरिता हेक्टरी 36 हजार रुपये रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कर्जमाफी निधी वितरण शासन निर्णय येथे पहा
ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.