या योजने अंतर्गत फक्त 02 हजार रुपयात शेत जमिनीचे वाद व तंटे शासन मिटवणार; असा करा अर्ज | Shet Jamin Bhandan Tante

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकऱ्यांचे शेत जमिनीशी संबंधित अनेक वाद आहेत, ज्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. अनेक जणांच्या जमिनी स्वतःच्या नावावर नाहीत ते दुसऱ्याच्या नावावर आहेत. अनेक जणांचे सातबारावर जास्त जमीन असून सुद्धा ते त्यांना कसता येत नाही. अनेक परिवारामध्ये तसेच भावा भावांमध्ये जमिनीशी संबंधित अनेक वाद आहेत. त्यामुळे शासनाने या Shet Jamin Bhandan Tante बाबींवर तोडगा काढण्यासाठी एक नवीन योजना राज्यात सुरू केलेली आहे.

 

या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांमध्ये किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात व कमी मुद्रांक शुल्कात शेतकऱ्यांना त्यांची शेत जमिनीशी संबंधित असणारे वाद मिटवता येणार आहे. तुमचा शेत जमिनीचा कोणताही वाद असो ते तुम्हाला कमी खर्चात शासन मिटवून देणार आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना सुरू केलेली आहे. या सलोखा योजना 2023 अंतर्गत आता तुम्हाला शेत जमिनीशी संबंधित वाद मिटवण्यासाठी शासनाकडे अर्ज करता येणार आहे.

 

मित्रांनो शेत जमिनीच्या वादाशी संबंधित अनेक प्रकरणे हे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. काही जणांचा शेत जमिनीच्या ताब्याबाबत वाद आहे, तर काही जणांची रस्त्यावरून वाद आहेत तसेच बऱ्याच जणांचे शेत जमिनीच्या मोजणीवरून वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणी तसेच भांडण तंटे सोडवण्यासाठी शासनाने या सर्व योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकदम कमी खर्च ठेवलेला आहे.

 

शेत जमिनीचे वाद मिटवण्यासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

 

शेत जमिनीचे वाद शासन कसे मिटवणार?

महाराष्ट्र शासन सलोखा योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांची विविध प्रकारचे शेत जमिनीशी संबंधित असणारे वाद तसेच तंटे मिटवणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे वाद मिटवण्यासाठी शासनाकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना याकरिता लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार असून त्यांची भांडण शासन स्वतः मिटवणार आहे. तलाठी व तहसीलदार तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी यांच्या मार्फत हे वाद मिटवण्यात येतील.

शेत जमिनीचे वाद केवळ 2 हजार रुपयात मिटवण्यासाठी अर्ज येथे करा

 

शेत जमिनीचे खालील वाद मिटवण्यात येणार:

मित्रांनो राज्यात झालेल्या तुकडे बंदी कायद्यापासून अनेक प्रकारचे वाद तसेच तंटे हे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेत जमीन नावावर दुसऱ्याची आहे आणि वाहणारा तिसरा आहे. तसेच स्वतःच जमीन करतो ती जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे. अशी अनेक तंटे आहेत त्याचबरोबर रस्त्याशी संबंधित बांधाशी संबंधित तसेच मालकी हक्काशी संबंधित तंटे तसेच इतरही अनेक तंटे शासनाच्या माध्यमातून मिटवण्यात येणार आहे.

याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करायचा असून शेतकऱ्यांना केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी खर्च शासनाकडे जमा करावा लागेल.

 

शेत जमिनीचे वाद केवळ 02 हजार रुपयात मिटवण्यासंबंधीचा शासन निर्णय येथे पहा

 

या योजनेमध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल, अशा शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व तसेच मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे. या बाबत महत्त्वाचा शासन निर्णय देखील राज्य शासनाने जाहीर केलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!