100 शेळ्या व 10 बोकुड खरेदी करिता नवीन अर्ज सुरू; 50 लाखापर्यंतचा अनुदान | Sheli Mendhi Anudan Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो राज्यात पशुपालकांचे प्रमाण वाढावे, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पशुपालनाचा नवीन व्यवसाय सुरू करता यावा, या दृष्टीने 100 शेळ्या व 10 बोकड यांच्या खरेदी करिता शासनाच्या मार्फत 10 लाख रुपयांपासून 50 लाख रुपये पर्यंतचा अनुदान वितरित करण्यात येत आहे. या Sheli Mendhi Anudan Yojana अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले असून अर्ज प्रक्रिया तसेच सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

शेळी व मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत राष्ट्रीय पशुधन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या मार्फत राज्यामध्ये सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान राबविण्यात येत असून राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना शेळी व मेंढी पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात Sheli Mendhi Anudan वितरित करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तात्काळ 50% अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

 

शेळी व मेंढी पालन करिता मिळणारे अनुदान

आपल्या राज्यात Rashtriya pashudhan vikas abhiyan राबविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून मंजुरी दिलेली असून त्या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत शेळी व मेंढी पालन करिता 50 लाख रुपये पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे तर कुक्कुटपालन व्यवसायाकरिता 25 लाख रुपये अनुदान तसेच वराह पालन व्यवसायाकरिता 30 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे.

सर्वात महत्वाची बातमी, खरीप पिक विमा 2022 खात्यात जमा होण्यास सुरुवात!

100 शेळ्या व 10 बोकड खरेदीसाठी कोण अर्ज करू शकतो? Apply For Sheli Mendhi Anudan Yojana?

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या 100 शेळ्या व 10 बोकड खरेदी अनुदान तसेच कुक्कुटपालन योजना आणि वराह पालन योजना अंतर्गत खालील लाभार्थी अर्ज करू शकतात.

1. वैयक्तिक शेतकरी किंवा पशुपालक

2. शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी

3. स्वयंसहायता गट

4. शेतकरी सहकारी संस्था

वरीलपैकी कोणीही या राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून 50 लाख रुपये पर्यंतचा लाभ मिळवू शकतो.

 

विविध प्रकारच्या शेतकरी योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू; एकाच अर्जात अनेक योजना

 

या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply for Sheli Mendhi Palan Anudan Yojana?

पशुधन अभियानाच्या योजनेअंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या अर्जदारांना राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. या योजने संदर्भात सर्व मार्गदर्शक सूचना हे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. खाली दिलेल्या केंद्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्जदारांना त्यांचा योजनेचा प्रस्ताव सादर करायचा आहे.

 

शेळी व बोकड पालन तसेच मेंढी पालन व वराह पालन योजनेअंतर्गत 50 लाख रुपये अनुदान ऑनलाईन अर्ज येथे करा

 

 

आवश्यक कागदपत्रे Required Documents For NLM Scheme

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरिता लाभ मिळण्याकरिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. रहिवासी पुरावा

4. अनुभव प्रमाणपत्र

5. प्रशिक्षण प्रमाणपत्र

6. जमिनी बाबत कागदपत्र

7. रद्द केलेल्या धनवेश

8. जीएसटी नोंदणी उपलब्ध असल्यास

9. आयकर रिटर्न

10. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)

 

योजने संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना येथे पहा

 

ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. योजने संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट करून प्रश्न विचारा.

Leave a Comment

error: Content is protected !!