मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घरकुल वितरित करण्यासाठी शबरी आवास योजना ही राबविण्यात येत आहे. याच शबरी आवास योजना अंतर्गत आपल्या राज्यातील 93288 लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात येणार आहे. या घरकुल वितरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. या योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे, या Shabari Awas Yojana 2023 Maharashtra अंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील आभार त्यांना किती घरकुल मिळणार आहे या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबांचं स्वतःचं पक्क घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे या दृष्टीने राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. या राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजना मध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील कुटुंबांकरिता विविध प्रकारच्या अनेक योजना राज्य शासन स्वतः राबवित आहेत. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे शबरी आवास योजना होय.
शबरी आवास योजना म्हणजे काय? What is Shabari Awas Yojana?
मित्रांनो राज्यातील आदिवासी बांधवांकरीता ही Shabari Awas Yojana Maharashtra 2023 राबविण्यात येत आहे. आदिवासी समाजातील ज्या गरीब कुटुंबांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या शबरी आवास योजना अंतर्गत घर बांधण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येत असून 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या shabari yojana maharashtra अंतर्गत मागील वर्ष 2022-23 करिता 24 हजार घरे वितरित करण्याचा लक्षात ठेवण्यात आलेला होता. परंतु राज्यातील आदिवासी बांधवांची संख्या लक्षात घेता, या shabari awas yojna अंतर्गत देण्यात येणारी घरे ही खूप कमी होती. त्यामुळे आता सन 2023 24 करिता नवीन 69 हजार घरे ही या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे.
घरकुल यादी 2023 जाहीर; अशी पहा सर्व जिल्ह्यांची नवीन घरकुल यादी
तसेच चालू वर्ष 2023 24 करिता नवीन 93 हजार 288 घरांना लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. या shabari awas yojna maharashtra 2023 संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय देखील शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
शबरी घरकुल आवास योजना अंतर्गत पात्रता:
1. या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल वितरित करण्यात येणार आहे.
2. कुटुंबांचा वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा कमी असावे.
3. आदिम जमाती तसेच पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
4. दिव्यांग लाभार्थ्यांकरिता पाच टक्के घरकुले राखीव असणार आहे.
5. प्रत्यक्ष तपासणी करून लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
जिल्हा निहाय घरकुलांची संख्या:
1. ठाणे जिल्हा- 1548
2. पालघर जिल्हा- 3038
3. रायगड जिल्हा- 2201
4. रत्नागिरी जिल्हा – 100
5. सिंधुदुर्ग जिल्हा- 20
6. अहमदनगर जिल्हा- 2800
7. धुळे जिल्हा- 4949
8. जळगाव जिल्हा- 3042
9. नंदुरबार जिल्हा- 12194
10. नाशिक जिल्हा- 8516
11. पुणे- 2200
12. सांगली- 20
13. सातारा- 20
14. कोल्हापूर- 20
15. सोलापूर- 109
16. औरंगाबाद- 1312
17. बीड- 393
18. हिंगोली- 9603
19. जालना- 598
20. लातूर- 212
21. नांदेड- 3500
22. उस्मानाबाद- 131
23. परभणी- 2135
24. अमरावती- 2970
25. अकोला- 3533
26. बुलढाणा- 1555
27. वाशिम- 1469
28. यवतमाळ- 4250
29. नागपूर- 5570
30. भंडारा- 449
31. वर्धा- 2390
32. चंद्रपूर- 8500
33. गडचिरोली- 2441
34. गोंदिया- 1500
कृषी यांत्रिकीकरण योजना सर्व जिल्ह्यांची सोडत यादी जाहीर; नवीन लॉटरी यादी आत्ताच करा डाऊनलोड
अशाप्रकारे प्रत्येक जिल्ह्याला वरील प्रमाणे घरकुल मिळणार आहेत.
कोल्हापुर