ओबीसींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना; नवीन घरकुल योजना सुरू | Savitribai Phule Gharkul Yojana

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना घरे बांधण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना ही सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओबीसी समाजातील बेघर लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व ओबीसी बांधवांना घरकुलासाठी अनुदान देण्यात येणार आहे. Savitribai Phule Gharkul Yojana Maharashtra मुळे अनेक ओबीसी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी राज्यातील वेगवेगळ्या समाजातील घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. मित्रांनो आपल्या राज्यामध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजना सुरू आहे, परंतु एकंदरीतच ओबीसी समाजातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात या योजनेअंतर्गत घरकुल मिळू शकत नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील प्रवर्गातील बेघर कुटुंबांकरिता त्यांना हक्काचे घर मिळवून देण्याकरिता राज्य शासन Krantijyoti Savitribai Phule Gharkul Yojana राबवित आहे.

 

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना काय आहे? What is Krantijyoti Savitribai Phule Gharkul Yojana

वितरण राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या घरकुल योजना आहे. ज्यामध्ये अनुसूचित जमाती करिता रमाई आवास योजना तसेच वी जयंती या प्रवर्गातील व्यक्तींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच पंतप्रधान घरकुल आवास योजना. परंतु स्पेशली ओबीसी समाजाचा विचार करता त्यांच्याकरिता कोणत्याही प्रकारची स्पेशल योजना नव्हती. त्यामुळे ओबीसी समाजातील बांधवांना घरकुल जास्त प्रमाणात मिळत नव्हते त्यामुळे आता राज्य शासनाने ओबीसी समाजातील बेगर कुटुंबांना दिलासा देण्यासाठी समाजातील कुटुंबातील लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी Savitribai Phule Gharkul Yojana सुरू करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही? तुम्हाला घरकुलाच्या यादीतून वगळले! अशी करा तक्रार; लगेच घरकुल मिळेल

सावित्रीबाई फुले घरकुल योजना अंतर्गत अनुदान किती मिळेल?

मित्रांनो ओबीसी समाजाकरिता राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले घरकुल योजना अंतर्गत सपाट भागासाठी 01 लाख 20 हजार रुपये तर डोंगरी भागाकरिता 01 लाख 30 हजार रुपये अनुदानाचे प्रावधान आहे. परंतु राज्य शासनाच्या वतीने या Savitribai Phule Gharkul Yojana Maharashtra ची व्याप्ती वाढवल्यास 1.50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान वितरित करण्यात येऊ शकते.

 

सावित्रीबाई फुले घरकुल योजना अंमलबजावणी:

राज्यातील ओबीसी समाजातील लाभार्थ्यांना या Savitribai Phule Gharkul Yojana अंतर्गत अनुदान देण्यात येणार असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष खालील समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या योजनेस मान्यता देण्यात आली होती परंतु कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय आला नव्हता त्यामुळे आता लवकरच शासनाच्या मार्फत योजनेचा प्रस्ताव तयार करून राज्यमंत्री मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.

नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी व खुशखबर; 1000 कोटी निधी वितरित, शासन निर्णय जाहीर

या योजनेअंतर्गत कोण लाभ मिळवू शकेल?

योजने अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी तसेच अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती तसेच भटक्या जमाती व व विमुक्त जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळवता येणार आहे.

हे नक्की वाचा: घरकुल योजना 2023 ची सर्व जिल्ह्यांची नविन यादी जाहीर, लगेच यादीत तुमचे नाव पहा

अशाप्रकारे महत्त्वपूर्ण अशा सावित्रीबाई फुले घरकुल योजना संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली आहे. या योजनेस संदर्भात नवीन अपडेट आल्यास तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून कळविण्यात येईल. ओबीसी घरकुल योजने संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!