या योजने अंतर्गत जमीन भाड्याने देऊन मिळवा 1.50 लाख रुपये भाडे; तसेच 24 तास वीज मोफत; जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती | Saur Krushi Vahini Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महावितरण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व चांगली योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी महावितरण ला त्यांची जमीन भाड्याने देऊ शकतात. त्या बदल्यात महावितरण त्या शेतकऱ्यास दीड लाख रुपयांपर्यंतचे भाडं तसेच वीज मोफत पुरविणार आहे. महावितरणच्या मार्फत राबविण्यात येणारी ही योजना काय आहे, या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळवायचा? तसेच त्याकरिता आवश्यक अटी व शर्ती आणि पात्रता या Saur Krushi Vahini Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो शेतकऱ्यांना भासणारी विजेची टंचाई दूर करण्यासाठी महावितरण च्या मार्फत एक महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी सहभागी होऊन महावितरण ला त्यांची जमीन भाड्याने देऊन विजेची टंचाई दूर करू शकतात तसेच महावितरण च्या मार्फत भाडे सुद्धा मिळू शकतात. या Saur Krushi Vahini Yojana मुळे शेतकऱ्यांना वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर विजेची निर्मिती ही सौर ऊर्जेच्या आधारे करण्यात येणार आहे.

 

सोलर कृषी वाहिनी योजना माहिती

मित्रांनो शेतकऱ्यांना बसणारी विजेची समस्या दूर करण्यासाठी महावितरण सोलर कृषी वाहिनी योजना राज्यात राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांची जमीन महावितरण ला भाड्याने देऊन प्रति एकर प्रमाणे तीस हजार रुपये भाडे मिळवू शकतात. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष अशी असणारी ही सोलर कृषी वाहिनी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी सहभागी झाल्यास त्यांना निश्चित भाडे मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची जमीन नापीक असेल किंवा पडीक असेल तर तुमच्या कविता ही एक उत्तम संधी आहे.

 

योजने अंतर्गत कोण सहभागी होऊ शकते?

या सोलर कृषी वाहिनी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमीन उपकेंद्राच्या परिघाजवळ आहे, असे शेतकरी सहभागी होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांकडून कमीत कमी तीन एकर जमीन महावितरण भाड्याने घेणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचे भाडे महावितरण शेतकऱ्याला देणार आहे.

शेतकऱ्यांनी जी जमीन महावितरण ला भाड्याने दिलेली आहे त्या जमिनीवर महावितरण विजेची निर्मिती करण्यासाठी सोलर प्लांट उभा करते. या Saur Krushi Vahini Scheme माध्यमातून महावितरण वीज निर्मिती करते व त्याचे भाडे शेतकऱ्याला देते. महावितरण च्या माध्यमातून सोलर प्लांट स्थापित करून ही वीज निर्मिती नैसर्गिक रित्या होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सोलर प्लांट लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त विजेची निर्मिती होणार आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त वेळ विजेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात अधिकचे पीक घेऊ शकतात, परिणामी त्यांची उत्पन्न देखील वाढवून घेऊ शकतात.

 

योजने अंतर्गत भाडे किती मिळेल?

मित्रांनो या सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत शेतकऱ्याला प्रति एकर तीस हजार रुपये प्रमाणे भाडे मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांनी पाच एकर जमीन महावितरण ला भाड्याने दिली तर त्या शेतकऱ्यास दीड लाख रुपये भाडे मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सहभागाची नोंदणी करणे सुरू असून जे शेतकरी या योजनेअंतर्गत स्वतःची जमीन भाड्याने देऊन भाडे मिळू शकत आहेत, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांची नोंदणी करायची आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

या योजने अंतर्गत अर्ज येथे करा

 

महावितरणच्या मार्फत मोठ्या प्रमाणात या योजनेअंतर्गत सौर प्लांट उभारण्यात येत असून अनेक शेतकरी सुद्धा या योजनेअंतर्गत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. ही योजना शेतकऱ्यांकरिता फार महत्त्वाची आहे कारण की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन महावितरण स्वतः भाड्याने घेणार असून त्यांना निश्चित प्रमाणात भाडे वितरण करणार आहे, त्याचबरोबर या सौर प्लांटच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर प्लांट स्थापित करून वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज पुरवठा करणारी ही एक महत्त्वाची योजना आहे. असे या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांची जमीन भाड्याने देऊन भाडे मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना निश्चित प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध असल्यामुळे शेतामध्ये रात्रीच्या वेळी जाऊन पिकांना पाणी देण्याची आवश्यकता भासणार नाही.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे येथे पहा

ज्या शेतकऱ्यांची जमीन पडीक आहेत, किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या स्वरूपातील आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत त्यांची जमीन भाड्याने घेऊन निश्चित भाडे मिळण्याची एक चांगली संधी आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!