गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश मिळणार; असा करा फ्री ऍडमिशन साठी अर्ज | RTE Admission 2023

मित्रांनो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना कोणत्याही इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत 25 टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश देण्यात येत असतो. जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थी असाल आणि तुम्हाला नामांकित इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी शासनाच्या मार्फत 25 टक्के राखीव जागांमधून प्रवेश मिळवता येतो. मित्रांनो आर टी ई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार तुम्हाला मोफत प्रवेश मिळवता येतो. मोफत प्रवेश कसा मिळवायचा त्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रे तसेच अटी व शर्ती व अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस या RTE Admission 2023-24 संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो शिक्षण हक्क कायदा म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट नुसार दरवर्षी 25 टक्के रिक्त जागा या आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असतात. मित्रांनो तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला या RTE Admission सुरू झाल्यानंतर अर्ज करायचा असतो. याच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असते.

 

मोफत प्रवेशासाठी नोंदणी केव्हा करायची?

मित्रांनो RTE Free Admission अंतर्गत वर्ष 2023 करिता असणाऱ्या 25 टक्के राखीव जागांसाठी जर तुम्ही नोंदणी करू इच्छित असाल तर या योजनेअंतर्गत वर्ष 2023 करिता नवीन अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करावे लागतील. यावर्षीची RTE Admission 2023-24 प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे.

 

मोफत प्रवेशांतर्गत यापूर्वी शाळांना नोंदणी करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. सर्व शाळांची मोफत प्रवेशासाठी नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

 

यावर्षी किती विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार?

मित्रांनो राईट टू इन्फॉर्मेशन ऍट नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवून देण्यासाठी दरवर्षी 25 टक्के जागा रिक्त ठेवण्यात येत असतात. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळपास आठ हजार आठशे वीस शाळांनी नोंदणी केलेली असून या शाळांमध्ये प्रामुख्याने 1 लाख 1 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.

प्रत्येक शाळेमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता 25 टक्के जागा रिक्त असतात.

 

 

मोफत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश कसा मिळणार? How to get free admission in English Medium School

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पाल्याचा मोफत कोणत्याही नामांकित इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागेल. Rte Portel वरून तुम्ही शैक्षणिक सत्र 2023-24 करिता तुम्हाला तुमच्या पाल्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

 

मोफत प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा

 

तुम्हाला तुमच्या जवळील शाळेमध्ये मोफत प्रवेश या राईट टू इन्फॉर्मेशन नुसार मिळवता येतो. याकरिता तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करून नंतर तुमची निवड झाल्यानंतर प्रवेश घ्यायचा असतो.

 

मोफत प्रवेशाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मोफत प्रवेशाचा अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थितपणे भरायची असते. तसेच तुमची सर्व कुटुंबिक माहिती आणि शैक्षणिक माहिती तसेच शेवटी ज्या शाळेमध्ये तुम्हाला मोफत प्रवेश घ्यायचा आहे, अशा शाळांची निवड तुम्हाला करावी लागते. अर्ज करताना तुम्हाला जवळील ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे अशा शाळा दिसतात. त्या शाळांची तुम्ही निवड करावी.

 

RTE 2023-24 फ्री ऍडमिशन चा अर्ज येथे करा

 

मोफत प्रवेशाचा अर्ज करताना तुम्हाला अर्ज हा व्यवस्थितपणे अचूक भरायचा आहे. जर तुम्ही केलेला अर्ज चुकला तर ते डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सादर करायची असून व्यवस्थितपणे स्कॅन करून कागदपत्रे अपलोड करावी तसेच अर्जदार जर दिव्यांग असेल तर त्या बाबत देखील कागदपत्र जोडावे. जर अर्जदार अनाथ असेल तर त्याबाबत देखील प्रमाणपत्र जोडावे.

Leave a Comment

error: Content is protected !!