रेशन कार्ड धारकांना आता रेशन ऐवजी पैसे मिळणार! नवीन निर्णय जाहीर; कोण असेल लाभार्थी, किती रुपये मिळणार संपूर्ण माहिती | Ration New Update Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासन रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या मोफत रेशन धान्य तसेच दोन रुपये प्रति किलो धान्य ऐवजी आता पैसे देण्या बाबत नवीन निर्णय जाहीर करत आहे. त्यामुळे राज्यातील या रेशन कार्डधारकांना आता दरमहा रेशन न देता त्याचे पैसे देण्याची योजना सुरू करण्यात येत आहे. रेशन कार्डधारकांना रेशन ऐवजी पैसे देण्याची ही योजना काय आहे? या योजनेअंतर्गत कोणते व्यक्ती लाभार्थी ठरणार आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी Ration Card New Update Maharashtra संदर्भात संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जवळपास 40 लाख रेशन लाभार्थ्यांना ज्यांची उत्पन्न हे 59 हजार ते 1 लाख मर्यादित आहेत. अशा लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना यापूर्वी सुरू करण्यात आलेली होती. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या मार्फत राज्य सरकारला धान्य देण्यात येत होती. परंतु मध्यंतरी ही योजना आपल्या राज्यात बंद करण्यात आलेली होती परंतु ही योजना बंद केल्यामुळे लाभार्थ्यांकडून नाराजी दिसून येत होती. त्यामुळे आता ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत असून या योजनेअंतर्गत आता धान्य एवजी पैसे देण्यात येणार आहे.

 

रेशन कार्डधारकांना रेशन ऐवजी पैसे देणारी योजना Schemes to pay ration card holders in lieu of ration

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मार्फत रेशन कार्डधारकांसाठी ही एक महत्त्वाची योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच या योजनेवर निर्णय होणार आहे. व ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

 

ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे?

राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरिता ही योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

1. बीड

2. लातूर

3. हिंगोली

4. औरंगाबाद

5. जालना

6. उस्मानाबाद

7. परभणी

8. नांदेड

9. बुलढाणा

10. अकोला

11. वाशिम

12. यवतमाळ

13. वर्धा

14. अमरावती

वरील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांकरिता ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांना किती व कसे पैसे मिळतील?

लाभार्थ्यांना धान्य एवजी पैसे देणारी महत्त्वाची योजना खालील प्रमाणे राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्याच्या रेशन साठी 150 रुपये मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर तुम्हाला महिन्याला 750 रू मिळतील आणि वर्षाला 9000 रुपये मिळतील.

महत्वाचं अपडेट: घरकुल योजना 2023 ची नवीन घरकुल यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा 

कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात सर्व कुटुंबातील व्यक्तींची रेशनचे पैसे जमा करण्यात येणार आहे. संबंधित महिलेचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक असणार आहे. लाभार्थ्यांना मिळालेल्या पैशांमधून त्यांनी बाजारामधून गहू किंवा तांदूळ खरेदी करावा किंवा वाचलेल्या पैशांमधून लाभार्थी त्यांच्या गरजेनुसार हे पैसे वापरू शकतात.

तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेची लॉटरी यादी जाहीर; असे पहा यादीत नाव

योजना कोण राबवित आहे?

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत अन्न व नागरी पुरवठा विभाग ही योजना आपल्या राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये राबवित आहे.

शेततळे अनुदान योजना अंतर्गत सर्व जिल्ह्यांचे नवीन अर्ज सुरू; मिळणार 75 हजार रुपये अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज 

ही योजना लवकरच राज्यात सुरू करण्यात येणार आहे. याबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. येणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अश्याच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!