या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता धान्य नाहीं तर 9000 रुपये प्रति वर्ष मिळणार; जाणून घ्या पात्र लाभार्थी | Ration New Changes

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता दर महिन्याला रेशन धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या मार्फत राज्यातील रेशन कार्ड धारकांना दोन रुपये प्रति किलो गहू आणि तांदूळ हा वितरित करण्यात येत होता. तसेच राज्यात केंद्र शासनाच्या मार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत अनेक गरिबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. परंतु आता महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आल्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील रेशन धारकांना रेशन ऐवजी पैसे मिळणार ते Ration New Changes आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

 

मित्रांनो राज्यात 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या मार्फत तेथील रेशन कार्ड धारकांना दोन रुपये प्रति किलो गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येत होता. ही योजना देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील गरीब आत्महत्याग्रस्त भागातील रेशन कार्ड धारकांसाठी राबविली होती. परंतु काही कालांतराने ही योजना बंद करण्यात आलेली होती.

 

परंतु ही योजना बंद केल्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांकडून नाराजीचा सूर ऐकायला मिळत होता. अनेक गरजू आत्महत्याग्रस्त भागातील व्यक्ती या रेशनच्या भरोशावर त्यांची जीवन जगत होते. परंतु शासनाने अचानक ही योजना बंद केल्यामुळे अनेकांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखे झाले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे, या निर्णयानुसार आता राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन धारकांना धान्य ऐवजी पैसे मिळणार आहे.

तुम्हाला या योजनेअंतर्गत रेशन ऐवजी पैसे मिळणार का ते येथे क्लिक करून जाणून घ्या

रेशन धारकांना वार्षिक 9000 कसे मिळणार?

या योजनेच्या अंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्यासाठी 150 रुपये मिळणार आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर तुम्हाला महिन्याला 750 रुपये मिळतील आणि महिन्याचा हिशोब केल्यास वार्षिक 9 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे.

 

रेशन कार्ड धारकांना रेशन ऐवजी पैसे वितरण करण्याचा शासन निर्णय येथे पहा

 

या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार असून या रकमेचा वापर रेशन कार्ड धान्य खरेदी करण्यासाठी करू शकतात किंवा त्यांच्या गरजेनुसार कोणत्याही कामासाठी हे पैसे वापरू शकतात.

 

फक्त यांनाच मिळणार वार्षिक 9000

राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे योजना लागू असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यात राहणाऱ्या रेशन कार्डधारकांनाच केवळ या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे.

 

कोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना 9 हजार रुपये मिळणार ते येथे पहा

 

अशाप्रकारे महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू केलेली आहे. ही माहिती महत्त्वाची असल्यास मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!