मित्रांनो रेशन कार्ड चे अनेक फायदे आहेत. अनेक वेळा शासकीय कामं करिता आपण रेशन कार्ड वापरतो, तसेच रेशन कार्ड च्या माध्यमातूनच केंद्र शासन तसेच राज्य शासन देशातील लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्याचे वाटप करीत आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे योजना या रेशन कार्ड धारकांकरिता लागू असतात, त्यामुळे Ration Card खूप महत्त्वाची ठरते. याच रेशन कार्ड संदर्भात एक महत्त्वपूर्ण असे अपडेट प्राप्त झालेले ते आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक वेळा शेतकरी बांधवांकडून तसेच इतर नागरिकांकडून विचारणा करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे तसेच जे शेतकरी सदन आहेत, अशा शेतकऱ्यांचा रेशन कार्ड बंद करण्यात आलेला आहे का? तसेच राज्यातील सरकारी, नोकरदार तसेच निमशासकीय नोकरीवर असणारे व खाजगी नोकरदार यांचे Ration Card बंद करण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे रेशन कार्ड संदर्भात असलेले Ration Card New Update तुमच्याकरिता महत्त्वाचे असणार आहे.
रेशन कार्ड बंद करण्या संदर्भात नवीन अपडेट:
आपल्या महाराष्ट्र राज्यात दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेशन कार्ड धारकांकरिता एक महत्त्वाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जे शेतकरी सदन आहेत, तरी सुद्धा रेशन कार्ड च्या माध्यमातून मोफत अन्नधान्य मिळतात परंतु त्यांना या अन्नधान्याची त्यांना गरज नाही, अशा लाभार्थ्यांना स्व इच्छेने त्यांना मिळणारे अन्नधान्य सोडण्याकरिता अर्ज करता येणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36,000 रू नुकसान भरपाई; शासन निर्णय जाहीर
या लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार बंद:
1. ज्या लाभार्थ्यांनी त्यांची आधार सीडींग केलेले नाही, अशा लाभार्थ्यांना रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहे.
2. काही लाभार्थी मयत झालेले आहेत, काही लाभार्थी नोकरी निमित्त किंवा व्यवसाय निमित्त दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, अशांची रेशन कार्ड रद्द होणार आहे.
3. बोगस रेशन कार्ड लाभार्थी यांची सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आहे.
4. पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेले परंतु सधन असणारे शेतकरी.
5. शासकीय नोकरीवर असून सुद्धा रेशन कार्डच्या योजनांचा लाभ मिळवणारे लाभार्थी
6. ज्यांचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत, अशांची ओळख पटवून त्यांची रेशन कार्ड बंद होणार आहे.
7. ज्यांचे वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपये पेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे.
8. मोठ्या प्रमाणात आयकर असणारे व्यापारी
9. आयकर भरणारे लाभार्थी
घरी लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेअंतर्गत रद्द करण्यात येणार नसून किंवा त्यांचे Ration Card बंद करण्यात येणार नसून त्यांच्याकरिता या विशेष मोहिमेअंतर्गत स्व इच्छेने रेशन कार्डच्या योजनांचा लाभ बंद करता येणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मोहीम राबविण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून वरील लाभार्थ्यांना त्यांची ओळख पटवून खात्री करून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. परिणामी अशा लाभार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे आपण रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वाची आणि एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.