रेशन कार्ड मध्ये घरातल्या सदस्यांची नावे अशी जोडा घरबसल्या ऑनलाईन | Ration Card New Membar

मित्रांनो आपल्या प्रत्येकासाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे असते. खास करून गरीब कुटुंबांसाठी रेशन कार्ड फार महत्त्वाचे असते कारण केंद्र शासनाच्या मार्फत तसेच राज्य शासनाच्या मार्फत रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या विविध व्यक्तींना अनेक योजनांचा लाभ मिळवता येतो. रेशन कार्ड धारकांना शासन मोफत धान्य वितरण करीत आहे तसेच अनेक शासकीय योजनांकरिता Ration Card तुम्हाला मागितले जाते. त्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये असायला पाहिजे. रेशन कार्ड मध्ये घरातले सदस्यांची नावे कशी जोडायची यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या परिवारात मधील एखाद्या सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये प्रविष्ट करायचं असेल किंवा तुमच्या परिवारातील लहान मुलांचे नाव रेशन कार्ड मध्ये प्रविष्ट करायचं असेल तर Ration Card New Membar Add करण्याची सुविधा आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्र शासनाने रेशन कार्ड च्या विविध सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फूड सेक्युरिटी पोर्टल लॉन्च केलेले आहे.

याच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड संबंधित अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने करता येतात. रेशन कार्ड मध्ये प्रामुख्याने Ration Card Add New Membar करणे किंवा मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करणे या दोन गोष्टी फार महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे ही गोष्ट करू शकतात. जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन करू शकत नसाल तर ऑनलाईन देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

रेशन कार्ड का महत्वाचे आहे?

मित्रांनो भारतातील महत्त्वाचा दस्ताऐवज हा रेशन कार्ड आहे. या रेशन कार्डच्या आधारे आपण विविध योजनांचा लाभ मिळवू शकतो. आपल्याकडे असलेले रेशन कार्ड हे आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. तसेच रेशन कार्ड धारकांना केंद्र शासन अन्नधान्य मोफत उपलब्ध करून देते. याव्यतिरिक्त अनेक कागदपत्रे काढण्यासाठी तसेच योजनांच्या लाभासाठी रेशन कार्ड मागितले जाते.

दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षीप्रमाणे प्रश्नपत्रिका 10 मिनिट अगोदर मिळणार नाही! जाणून घ्या महत्वाची माहिती

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे का गरजेचे आहे?

मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात एखाद्या नवीन मूल जन्माला आला असेल किंवा तुम्ही एखादं मूल दत्तक घेतला असेल तर तुम्हाला त्या मुलाचे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये प्रविष्ट करावे लागत असते. कारण की Ration Card च्या माध्यमातून रेशन मिळवताना आपल्याला युनिट नुसार रेशन मिळते म्हणजेच Ration Card मध्ये जेवढे व्यक्तींची नावे असतील त्यानुसार आपल्याला धान्य मिळते त्यामुळे नवीन सदस्याचे नाव ॲड करणे महत्त्वाचे ठरते.

असे मिळवा डिजिटल रेशन कार्ड, रेशन कार्ड हरवल्यास किंवा फाटल्यास काहीही फरक पडणार नाही

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे ॲड करायचे? How to add name of new member in ration card?

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांची नाव Ration Card मध्ये ऍड करायचे असेल तर तुम्ही दोन प्रकारे करू शकतात. पहिली प्रक्रिया म्हणजे तुम्ही ऑनलाईन नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलच्या वेबसाईटवरून करू शकतात. दुसरा प्रकार म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जाऊन विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज जमा करून रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऍड करू शकतात.

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाईन इथे ॲड करा

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऑफलाइन ऍड करणे साठी करावयाचा अर्ज येथे पहा

वरीलपैकी कोणत्याही प्रकारे आपण आपल्या परिवारातील नवीन सदस्यांचे नाव Ration Card मध्ये प्रविष्ट करू शकतो. रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करण्यासंदर्भातील ही माहिती महत्त्वाची असेल तर सर्व मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!