असे मिळवा डिजिटल रेशन कार्ड, रेशन कार्ड हरवल्यास किंवा फाटल्यास काहीही फरक पडणार नाही | Ration Card Download

मित्रांनो शासनाच्या मार्फत आपल्याला डिजिटल रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हि रेशन कार्ड आपण ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकतो. जर तुमच्याकडे असलेले पूर्वीचे रेशन कार्ड हरवले असेल किंवा ते फाटले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपण आपली रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करून शकतो तसेच ते आपल्या मोबाईल मध्ये सेव करून देखील ठेवू शकतो. हे रेशन कार्ड आपण प्रिंट सुद्धा करू शकतो. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात मिळविण्याची तसेच Ration Card Download करण्याची संपूर्ण प्रक्रिया माहीत असायला पाहिजे.

 

मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे याकरिता तुम्हाला फक्त तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकाचा Online Ration Card Number माहित असावा लागतो. आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने हे Ration Card मिळवू शकतो. जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही या रेशन कार्ड ची प्रिंट सुद्धा काढू शकतात. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड मिळवण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

100 शेळ्या व 10 बोकुड खरेदी करिता नवीन अर्ज सुरू; 50 लाखापर्यंतचा अनुदान

मित्रांनो देशातील प्रत्येक गरिबाला केंद्र तसेच राज्य सरकार वेळोवेळी थेट रेशन कार्ड च्या माध्यमातून कोणताही लाभ मिळवून देत असते. त्याचप्रमाणे मोफत धान्याचे वितरण सुद्धा रेशन कार्डच्या साह्याने केले जाते. त्यामुळे प्रत्येक गरीब नागरिकाला त्याचे रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशन कार्ड असल्यास कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळवता येतो. परंतु जर हे तुमचे रेशन कार्ड हरवले असेल किंवा सध्या जर तुमच्याजवळ ते नसेल तर आपण ऑनलाईन देखील हे रेशन कार्ड मिळवू शकतो. आता आपण रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

आभा कार्ड कसे काढायचे? देशात कुठेही मिळणार मोफत उपचार; घरबसल्या काढा हे कार्ड, अनेक फायदे

रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे?

रेशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये मिळवायचे असेल तर तुम्ही रेशन कार्ड च्या क्रमांकाच्या माध्यमातून खालील प्रमाणे तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात.

1. सर्वप्रथम तुम्हाला ration card चे अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.

2. रेशन कार्ड ची म्हणजेच NFSA ची अधिकृत वेबसाइट. अधिकृत वेबसाईटची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

3. आता तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातील अनेक पर्याय या वेबसाईटवर दिसत आहेत.

4. आता तुम्हाला रेशन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डिजिटल स्वरूपात मिळवण्यासाठी या संकेतस्थळावरील Ration Cards हा ऑप्शन निवडा.

5. आता Ration Card Details On State Portals हा पर्याय सलेक्ट करा.

6. आता तुमच्यासमोर भारत देशातील सर्व राज्यांची नावे आलेली आहेत त्यापैकी महाराष्ट्र नाव निवडून घ्या.

7. आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा, त्यानंतर ग्रामीण किंवा शहरी हा पर्याय निवडून द्या.

8. आता तुमच्या ब्लॉकचे नाव तुम्ही या ठिकाणी निवडा.

9. आता तुम्ही ब्लॉकचे नाव निवडल्यानंतर त्या ब्लॉक मध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची यादी स्क्रीनवर उघडेल.

10. यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या म्हणजेच गावाच्या नावावर क्लिक करा.

11. आता तुम्ही जे गाव निवडलेले आहेत त्या गावाचे सर्व रेशन कार्ड धारकांची यादी तुमच्यासमोर ओपन झालेली असेल.

12. यापैकी या यादीत तुमचे नाव शोधा आणि तुमच्या नावासमोर असणाऱ्या रेशन कार्ड नंबर वर क्लिक करा.

13. आता तुमचे रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन झालेले आहे. याची तुम्ही प्रिंट काढून घ्या किंवा पीडीएफ मध्ये मोबाईल मध्ये सेव करा तसेच डाऊनलोड करून घ्या.

रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

घरी लिंक वरून तुम्ही थेट रेशन कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकतात आणि तुमचे डिजिटल स्वरूपातील रेशन कार्ड वरील प्रमाणे मिळवू शकतात. रेशन कार्ड संदर्भातील ही एक छोटीशी अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!