शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 50 हजार अनुदान योजना राज्यामध्ये राबवणे सुरू आहे. या पन्नास हजार अनुदान योजनेच्या आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेले आहे. 50000 अनुदान योजनेच्या यादीत नाव असलेल्या शेतकरी बांधवांना 50000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे. अनेक शेतकरी होते ज्यांचे नाव Protsahan Anudan Yojana यादी मध्ये येऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नव्हती त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता रक्कम जमा होणे सुरुवात झालेली आहे.
अनेक शेतकरी बांधवांची नावे ही पन्नास हजार अनुदान योजनेच्या याद्या मध्ये आलेली आहेत. जवळपास पहिल्या यादीत नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Protsahan Anudan Yojana Maharashtra 2023 ची रक्कम जमा करण्यात आलेली होती परंतु नियमित कर्जमाफी 50000 अनुदान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली होती, आणि त्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केले होते, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पर्यंत अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी ज्यांची नावे 50 हजार अनुदान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या यादीमध्ये आलेले होती. असे शेतकरी अनुदान जमा होण्याची वाट पाहत होते. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. पी एम किसान योजना 50000 Anudan Yojana रक्कम वितरण संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट आपल्याकडे आलेले आहे.
50000 प्रोत्साहन अनुदान कधी पर्यंत जमा होणार?
शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे पन्नास हजार ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 01 फेब्रुवारी 2023 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उर्वरित जे शेतकरी अजूनही बाकी आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे.
आतापर्यंत किती रुपये वितरित करण्यात आले?
शेतकरी मित्रांनो शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 3700 कोटी रुप ये हे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम म्हणून वितरित करण्यात आलेले आहेत.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36,000 रू नुकसान भरपाई; शासन निर्णय जाहीर
शेतकरी मित्रांनो अजूनही 1000 कोटी रुपये इतका निधी या योजनेअंतर्गत वितरित करणे बाकी आहे. योजनेअंतर्गत आणखीन एक यादी लवकरच प्रकाशित होणार आहे. या यादी संदर्भात तसेच पुढील रक्कम वितरणा संदर्भात काही अपडेट आल्यास तुम्हाला या वेबसाईटवर कळवण्यात येईल.
अशाप्रकारे एक छोटीशी अपडेट आपण पन्नास हजार अनुदान योजना संदर्भात जाणून घेतलेली आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत रक्कम मिळाली का? ते कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती महत्त्वपूर्ण असल्यामुळे तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
आमाले अद्या नाही आले अनुदान केव्हा येहील ते महाराष्ट्र शासन ला माहिती