गावातील सरपंच, उपसरपंच, मेंबर यांची संपत्ती किती आहे, ते असे चेक करा ऑनलाईन | Property Of Sarpanch And Members Online Check

महाराष्ट्र शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत गावातील मेंबर तसेच सरपंच व उपसरपंच यांची संपत्ती गावात राहणाऱ्या नागरिकांना पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत मधील निवडणुकीमध्ये कोणताही उमेदवार उभा राहिल्यानंतर त्यांना संपत्तीचा लेखाजोखा सादर करावे लागते. त्यामुळे गावातील सरपंच व उपसरपंच यांची Property Of Sarpanch And Members आपल्याला ऑनलाइन पाहता येत आहे. या पोस्टमध्ये आपण सरपंच उपसरपंच यांची संपत्ती किती आहे, याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो गावातील Sarpanch व Upsarpanch तसेच मेंबर यांना जनतेच्या माध्यमातून निवडून यावे लागते. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज करत असताना राज्य निवडणूक आयोगाकडे अफिडेविट सादर करावे लागत असते. त्या अफिडेविट नुसार त्या उमेदवाराला त्याची संपूर्ण मालमत्ता व संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो. त्यामुळे इतरांना तो उमेदवार किती श्रीमंत आहे. त्याच्याकडे असलेली एकूण संपत्ती याची माहिती मिळते.

 

सरपंच व उपसरपंच तसेच मेंबर ची संपत्ती अशी पहा ऑनलाईन Property of Sarpanch and members Check Online

जर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधील सरपंच तसेच उपसरपंच किंवा मेंबर किंवा उमेदवारांची संपत्ती पाहायची असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

 

1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे.

2. आता या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्समध्ये ग्रामपंचायत इलेक्शन नावाचा शब्द टाकून तो सर्च करायचं आहे.

3. आता तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल.

4. राज्य निवडणूक आयोगाच्या https://panchayatelection.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

5. आता तुम्हाला Affidavit by the final contesting candidates हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

6. आता तुम्हाला विविध पर्याय पैकी local Body या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

7. आता तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधील माहिती पाहिजे असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायत पर्याय निवडा.

8. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डिव्हिजन तसेच तुमचा जिल्हा आणि तुमच्या तालुका व तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे.

9. त्यानंतर इलेक्शन प्रोग्राम नेम निवडून घ्यायचं आहे.

10. त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत सरपंच जनरल इलेक्शन हा पर्याय निवडायचा आहे.

11. जर सरपंचाची उपसरपंचाची संपत्ती बघायची असेल तर पहिला पर्याय निवडा तसेच सदस्याची संपत्ती किंवा विरोधी पक्षाची निवडायची असेल तर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन निवडा.

12. आता वरील ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला view Affidavit या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

13. आता तुमच्यासमोर त्या उमेदवाराची संपूर्ण Affidavit मध्ये सादर केलेली, संपूर्ण संपत्तीचा तपशील ओपन झालेला असेल.

 

अशाप्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने गावातील ग्रामपंचायत मधील सदस्य मेंबर तसेच सरपंच आणि उपसरपंच आणि उमेदवार यांची संपत्ती पाहू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!