जमीन नावावर होण्यासाठी लागणार फक्त 100 रुपये; जाणून घ्या शंभर रुपयात जमीन नावावर कशी करायची? | Procedure for registering land in 100 Rs

मित्रांनो आजच्या काळात जमीन प्रत्येकाला हवी आहे. आपल्या घरातील आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असलेली जमीन आपण ते हयात असताना आपल्या नावावर करू इच्छित असतो. अनेक वेळा कुटुंबातील प्रमुख व्यक्ती त्यांच्या मुलांच्या किंवा आपत्याच्या नावाने समाधीसने जमीन नावाने करून देते. परंतु शासनाच्या मार्फत याकरिता मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी आकारण्यात येते त्यामुळे बरेच जण ही गोष्ट करत नाहीत. परंतु ही जमीन आपल्याला शंभर रुपयांमध्ये नावावर करता येते. या Procedure for registering land संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अनेक व्यक्तींना वडिलोपार्जित असलेली त्यांच्याकडील संपत्ती किंवा जमीन त्यांच्या नावावर करायची असते, परंतु शासनाच्या मार्फत शेत जमिनीवर नावे करण्यासाठी आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी लागत असल्यामुळे वेळीच ते त्यांची जमीन नावावर करत नाहीत. परंतु कालांतराने कुटुंबामध्ये काही वाद निर्माण होतात, इतर समस्या निर्माण होतात त्यामुळे वेळोवेळी वाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात

वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा 7/12 उतार्‍यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या पायर्‍या झिजविण्याची गरज नाही. सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

 

मयत व्यक्तींच्या नावाची जमीन सदस्यांच्या नावावर 100 रुपयात कशी करायची?

मित्रांनो जर एखाद्याच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झालेला असेल तर त्यांच्या नावावरील जमीन त्यांच्या वारसदाराच्या नावावर करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार आपण तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून वारसदाराची नोंद त्या सातबारावर करू शकतो. तसेच ही जमीन तुमच्या नावावर करू शकतात.

100 रुपयात जमीन नावावर करण्याचा ऑनलाईन अर्ज येथे करा 

जमीन नावावर करण्याची प्रक्रिया? Procedure for registering land

याकरिता तुम्हाला जर तुम्ही त्या जमिनीचे वारसदार असाल तर तुम्हाला तुमचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल सुविधा 1966 च्या कलम 85 नुसार माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो. या अर्जाची अंमलबजावणी करण्यात येते तसेच ही जबाबदारी सर्वस्वी तलाठी यांच्यावर सोपवण्यात येते. तलाठी जमिनीच्या वारसदारांची खात्री करून घेतात, त्यानंतर ही जमीन शंभर रुपयांमध्ये तुमच्या नावावर होते. जर महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काही बदल केला तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरावी लागू शकते. तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जमिनीचे वाद मिटवण्यासाठी अनेक योजना सुद्धा राबविल्या आहेत

अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांची नवीन लाभार्थी यादी आज जाहीर; लगेच नाव पहा

100 रुपयात जमीन नावावर करा Registration of Land in 100 rs

राज्यातील जमिनीचे तंटे तसेच वाद सोडवण्यासाठी सलोखा नावाची योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. अत्यंत कमी फी तसेच कमी स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून हे जमिनीचे वाद सोडविता येणार आहे तसेच जमीन नावावर करणे तसेच इतर सुद्धा अनेक प्रकारची जमिनीशी संबंधित कामे आपण या योजनेअंतर्गत करू शकतो.

100 रुपयात जमीन नावावर करण्याचा शासन निर्णय येथे पहा

राज्यात राबविण्यात येणाऱ्या या तालुका योजना अंतर्गत फक्त शंभर रुपये स्टॅम्प ड्युटी तसेच नोंदणी तिच्या माध्यमातून तुमच्या जमिनीची संबंधी सर्व व्यवहार करता येणार आहे. तुम्हाला तुमची जमीन शंभर रुपयांमध्ये नावावर देखील करता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!