मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन योजना अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. राज्य शासनाबरोबरच केंद्र शासन सुद्धा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन या घटकांतर्गत लाभ मिळवून देत आहे. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 कोंबड्या आणि एक पिंजरा मोफत वाटप करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कुक्कुटपालनाकरिता 25 लाख रुपये पर्यंतचा अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेमार्फत तसेच राज्यस्तरावर नाविन्यपूर्ण या घटकांतर्गत कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या Poultry Farming Yojana राबवित असते.
कुकुट पालन अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा? W here to apply for Poultry Subsidy?
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 कोंबड्या आणि एक पिंजरा या घटकांतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर अर्ज करावा लागेल. जर तुम्ही केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कुक्कुटपालनाकरिता 25 लाख रुपयांपर्यंतचा अनुदान मिळण्यासाठी अर्ज करणारा असाल तर तुम्हाला राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
मित्रांनो वरील लिंक वरून राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या मार्फत कुक्कुटपालनाला चालना देणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. प्रकल्प अहवाल
3. पॅन कार्ड
4. कुक्कुटपालन व्यवसायाचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र
5. कुकुट पालनाचे प्रशिक्षण घेतल्याबद्दल प्रमाणपत्र
6. यापूर्वी लाभ न घेतल्या बाबतचे स्वयंघोषणापत्र