शेतकऱ्यांना 50 कोंबड्या आणि 1 पिंजरा मोफत वाटपासाठी नवीन अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज | Poultry Farming Scheme

मित्रांनो राज्यातील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत मोफत 50 कोंबड्या आणि 01 पिंजऱ्याचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून पशुपालन करणारे शेतकरी लाभ मिळवू शकणार आहे. या Poultry Farming Scheme Maharashtra संदर्भात अर्ज प्रक्रिया तसेच संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असतात. मित्रांनो काही शेतकरी शेती व्यवसाय बरोबरच शेळीपालन तसेच वराह पालन किंवा मत्स्य पालन करतात. परंतु कुकूटपालन हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येणारा महत्त्वाचा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. त्यामुळे या Poultry Farming व्यवसायात जास्तीत जास्त वाव असल्यामुळे अनेक शेतकरी हा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत.

 

मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करावा वाटतो. परंतु पुरेसे भांडवल नसल्यामुळे हे शेतकरी कुक्कुट पालनाकरिता आवश्यक असणारे Poultry Farming शेड तयार करू शकत नाहीत. तसेच कुकूटपालन पक्षी खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे मित्रांनो हे शेतकरी कधीच त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू शकत नाही. शेतकऱ्यांना व्यवसाय करिता आवश्यक असणारे कर्ज मिळण्याची सुद्धा माहिती नसते.

 

त्यामुळे महाराष्ट्र शासन शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन योजना राबवत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन करिता अनुदान देणारी योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 कोंबड्या आणि  त्याकरिता लागणारा एक पिंजरा मोफत वाटप करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो पालन हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे या व्यवसायात कोंबड्यांना सुद्धा मागणी आहे त्याचबरोबर कोंबड्यांद्वारे देण्यात येणाऱ्या अंड्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या देशातील अनेक भागात अंड्याचा तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे त्याचे भाव देखील वाढलेले आहेत. त्यामुळे शासनाने कुक्कुटपालन व्यवसाय जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी करावा आणि पूरक व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक विकास साधून घ्यावा याकरिता ही योजना सुरू केली आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे करा

 

कुकुट पालन योजना महाराष्ट्र:

मित्रांनो राज्यात राज्य आणि जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या अंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर तलंगा गटाचे वाटप करण्यात येत असते. तसेच तीन नर कोंबडे आणि शंभर एक दिवशीय प्रगत कुक्कुटपालन गट हे या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येत असतात. राज्यात कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना राबविण्यात येत असते.

 

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एकात्मिक विकास आराखड्याच्या सहाय्याने 50 टक्के अनुदानावर कोंबड्यांचे गट वाटप करण्यात येत असतात. त्याचबरोबर केंद्र शासन सुद्धा राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंतर्गत कुक्कुटपालनाकरिता 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान वितरित करीत आहे. राज्य शासन सुद्धा जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पशुसंवर्धन अभियानाच्या अंतर्गत कुक्कुटपालनाच्या विविध योजना राबवून पशुपालक शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करीत असते.

 

योजनेचा शासन निर्णय येथे पहा

मित्रांनो शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या 50 कोंबड्या आणि एक पिंजरा मोफत वाटप करण्याच्या या योजनेअंतर्गत अधिकृत शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. तो तुम्ही वरील लिंक वरून डाऊनलोड करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!