कुसुम योजना अंतर्गत हे शेतकरी ठरणार अपात्र! या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ, जाणुन घ्या कारण | PM Kusum Yojana Disqualified List

देशातील सर्व शेतकरी बांधवांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून कृषी पंप उपलब्ध व्हावे तसेच या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाणी उपलब्ध करून घेता यावे. व जास्तीत जास्त पीक शेतामध्ये पिकवून शेतकरी समृद्ध व्हावा या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्फत पीएम कुसुम योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. केंद्र शासन संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करीत आहे. त्यामुळे आता या योजने संदर्भात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे खालील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरवून त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही.

 

या पीएम कुसुम योजना अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, कोणते शेतकरी अपात्र करण्यात येणार आहे. या Kusum Yojana Disqualified Farmers List संदर्भात छोटासा अपडेट आपण जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो राज्यात केंद्र शासनाच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या अंतर्गत महावितरणच्या मार्फत देखील योजना राबवित आहे. तसेच राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू आहे. केंद्र शासन प्रत्येक राज्याकरिता pm kusum अंतर्गत सौर कृषी पंपाचे ध्येय निश्चित करत असते. आणि त्यानुसार प्रत्येक राज्याला सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येत असते.

 

परंतु राज्य शासनाच्या मार्फत kusum सारख्या योजना राज्यात राबवण्यात येतात परंतु त्या केंद्र शासनाच्या पाठपुराव्यानेच राबविण्यात येत असतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा लाभ मिळू नये यासाठी शासन प्रयत्न करत असते. शासनाच्या एका योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविल्यास दुसऱ्या योजने करिता त्या शेतकऱ्यास अपात्र ठरविण्यात येत असते.

 

खालील शेतकरी अपात्र ठरतील

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कुसुम योजना तसेच अटल सौर कृषी पंप योजनेचा टप्पा एक आणि टप्पा दोन तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी लाभ मिळवलेला आहे. अशा शेतकऱ्यांना महा कृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक – ब योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी वरील योजना अंतर्गत लाभ मिळवलेला आहे त्यांनी महा कृषी ऊर्जा अभियानाच्या पीएम -कुसुम घटक- ब योजनेसाठी अर्ज न करण्याचे आवाहन करण्यात आलेली आहे. जर आधी लागणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज केला तर त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात येणार आहे.

 

त्याचप्रमाणे महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक- ब योजनेअंतर्गत जर एका शेतकऱ्याने एकाच सौर कृषी पंपाकरिता एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केला तर त्याचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

 

अनेक शेतकरी राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ मिळतात परंतु लाभ मिळाल्यानंतर तसेच सौर कृषी पंप त्यांच्या शेतात स्थापन झाल्यानंतर ते काढून ठेवतात. व त्यांच्या शेतात सौर कृषी पंप नसल्याचे भाषण दुसऱ्या योजनेअंतर्गत किंवा त्या योजनेच्या दुसऱ्या घटकांतर्गत नवीन अर्ज करतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची अर्ज रद्द करण्यात येणार असून, असे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यांच्या शेतातील सौर कृषी पंप काढून घेण्यात येईल तसेच त्यांनी भरलेला लाभार्थीचा जप्त करण्यात येणार असून अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे आपण पीएम कुसुम योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!