पीएम किसान योजना 13वा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, 13 व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर; लगेच चेक करा यादीत नाव | PM Kisan Yojana Status Check

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत केंद्र शासनाने 12 हप्ते वितरित करण्यात आलेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आहेत, जे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या तेरावे हप्त्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात माहिती तसेच तुम्हाला पीएम PM Kisan Yojana 13 हप्ता मिळणार का, ते स्वतः कशे चेक करायचे या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पीएम किसान योजना अंतर्गत केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर बरेच शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली होती. परंतु देशातील अनेक शेतकरी आहेत, जे अजून पर्यंत बोगस असून सुद्धा योजनेअंतर्गत लाभ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांना आळा घालण्याकरिता केंद्र शासनाने नवीन बदल केलेले आहे.

 

त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार का याची अपेक्षा असून सुद्धा तो हप्ता आपल्याला मिळणार का नाही? याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्यामुळे आता आपण काहीही तुम्हाला स्टेप सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पुढील तेरावा हप्ता मिळणार का ते सहज चेक करू शकतात.

 

पी एम किसान 13 वा हप्ता मिळणार का? ते असे चेक करा How to Check PM Kisan Yojana 13th Installment status

1. आता तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.

2. आता तुम्हाला या वेबसाईट मध्ये फार्मर्स कॉर्नर(farmers corner) हा एक ऑप्शन दिसत आहे.

3. त्या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तेरावा हप्ता मिळणार का ते चेक करण्यासाठी benificery list या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

4. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

5. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण पीएम किसान योजनेची माहिती दिसत असेल.

6. यामध्ये जर तुमची पी एम किसान सन्मान निधी योजनेचे स्टेटस yes असेल आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी त्या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळणार का नाही? ते सहजपणे ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतो

या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 13000 ऐवजी 27000 हेक्टरी मदत मिळणार; लगेच आपले नाव पहा 

यांना मिळणार नाही 13 वा हप्ता:-

मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत पीएम किसान ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांचे अकाउंट नंबर किंवा आधार नंबर किंवा बँकेची डिटेल ही चुकलेली आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ता मिळणार नाही.

पी एम किसान योजना 13 व्या हप्त्याची अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; चेक करा आपले नाव

पी एम किसान योजना 13वा हप्ता कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो संपूर्ण भारत देशातील जवळपास 12 कोटी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 27 फेब्रुवारी 2023 ला सोमवार या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेराव्या त्याची दोन हजार जमा करणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!