मित्रांनो देशातील सर्व शेतकरी मित्रांना केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तसेच लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेअंतर्गत तेरावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येत आहे. परंतु अनेक शेतकरी आहेत ज्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आले का ते चेक करता येत नाहीत.
त्यामुळे आपण या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये आली का ते सहज चेक करण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये सन्मानार्थ राशी म्हणून देण्यात येत असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने PM Kisan Yojana Installment Payment Status चेक केले पाहिजे
रेशन कार्ड संदर्भात महत्वाचं अपडेट; यांचे रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या कारण
पी एम किसान योजनेचे 2 हजार रुपये खात्यात आले का, तर असे चेक चेक करा
मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत असून तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात. पी एम किसान सन्मान योजना चे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले का ते चेक करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
1. सर्वप्रथम pm kisan योजनेची शेतकरी स्थिती चेक करण्याची वेबसाईट ओपन करा.
2. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
3. त्यानंतर तुम्हाला खाली दिसत असलेल्या कॅपच्या कोड त्या रकान्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे.
4. शेवटी सर्च या पर्यायावर क्लिक करा.
5. आता तुमच्यासमोर तुमची संपूर्ण पीएम किसान योजनेची माहिती आलेली आहे.
6. त्या ठिकाणी पी एम किसान योजना अंतर्गत जो मागील हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, त्याची माहिती असेल.
7. जर त्यासमोर तुम्हाला fund distribute किंवा अमाउंट ट्रान्सफर असा पर्याय दिसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे.
वरील लिंक वरून तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ते सहज चेक करू शकतात.
पुढील तेरावा हप्ता केव्हा मिळणार? Pm Kisan 13 th Installment
केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 12 हप्ते वितरित केलेले केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची अधिकृत तारीख सुद्धा जाहीर केलेली आलेली आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा करण्याची संपूर्ण तयारी केलेली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा होणार आहे.
पी एम किसान योजना संदर्भातील ही माहिती महत्त्वाची असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या विविध योजना संबंधित माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.