पी एम किसान योजना 13 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही! जाणून घ्या कारण | Pm Kisan Yojana 13th Installment

शेतकरी मित्रांनो देशामध्ये शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. मित्रांनो PM Kisan संबंधित योजना अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत आर्थिक सवलत मिळावी म्हणून दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत तेरावा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली असून त्यापूर्वी आपण कोणत्या शेतकऱ्यांना PM Kisan 13th Installment मिळणार नाही या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

 

केंद्र शासनाच्या मार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ वितरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता तसेच योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारा लाभ हा योग्य पद्धतीने व लवकरात लवकर मिळावा. तसेच या pm kisan yojna अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा याकरिता अनेक बदल पीएम किसान योजना मध्ये केलेले आहेत.

घरकुल यादी 2023 जाहीर; अशी पहा सर्व जिल्ह्यांची नवीन घरकुल यादी

त्यामुळे आता राज्यातील तसेच देशातील अनेक शेतकरी बांधव आहेत जे या pm kisan scheme अंतर्गत काही कारणास्तव पात्र नाहीत. त्यामुळे ते येणाऱ्या पुढील हप्त्यांमध्ये लाभ मिळण्यापासून वंचित राहणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता लवकरच केंद्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर पी एम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याबद्दल खाली माहिती जाणून घेऊया.

 

पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्या! नाहीतर हप्ता मिळण्याची शक्यता कमी

 

पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता यांना मिळणार नाही

1. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी PM Kisan Yojana अंतर्गत ई केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

2. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत संलग्न नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

3. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही चुकी असतील तर त्यांना सुद्धा मिळणार नाही.

4. ज्या शेतकऱ्यांची पम Kisan Status नो किंवा रिजेक्टेड दाखवत असेल त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

5. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची डिटेल्स त्यामध्ये प्रामुख्याने अकाउंट नंबर किंवा आयएफसी कोड चुकलेला आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

6. याशिवाय अपात्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ता मिळणार नाही.

 

पीएम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता तुम्हाला मिळणार का? ते असे चेक करा! लगेच

 

 

पी एम किसान योजना संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!