वा रे वा, 53 हजार अपात्र शेतकऱ्यांनी मिळवला पी एम किसान योजनेचा लाभ; 43 कोटींचा घोटाळा आला समोर, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PM Kisan Samman Nidhi Yojana

मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये राशी प्रदान करण्यात येत आहे. पी एम किसान योजनेच्या अंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला स्वतः नोंदणी करता येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे बोगस शेतकरी लाभ मिळवत आहे. अशाच प्रकारची एक माहिती समोर आलेली आहे पी एम किसान योजनेअंतर्गत 53 हजार अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवलेला आहे. त्यामुळे शासनाची 43 कोटी रुपये या पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे कोणत्या ठिकाणी अपात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवला, या PM Kisan Samman Nidhi Yojana संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

PM Kisan Samman Yojana अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी खोटी माहिती देऊन शासनाच्या तिजोरीतील अनेक पैसे उडवलेले आहे. 53 हजार अपात्र असलेल्या शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे योजनेअंतर्गत सादर करून pm kisan yojana चे 43 कोटी रुपये मिळवले आहे. सुरुवातीला आपण या योजनेअंतर्गत दहा शेतकरी वी शेतकरी हजार शेतकरी असा आराखडा पाहत होतो. परंतु आता तब्बल 53 हजार अपात्र लाभार्थी सापडलेले आहेत.

 

बोगस लाभार्थी कुठे आढळले?

शेतकरी मित्रांनो छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये हे 53 हजार शेतकरी अपात्र असल्याचे आढळून आलेले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर करून आत्तापर्यंत अनेक हप्ते त्यांच्या खात्यामध्ये मिळवलेले आहे. त्यामुळे आता पीएम किसान योजनेमध्ये हा एक मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचा प्रकार आढळून आलेला आहे.

पी एम किसान 13वा हप्ता येण्यापूर्वी लवकर हे काम करा; नाहीतर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही

सुरुवातीला या योजनेअंतर्गत अपात्र शेतकरी कमी असल्याची माहिती मिळत होती परंतु तपास केल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढली आणि ती 53,000 वर पोहोचली. तसेच या योजनेअंतर्गत सुरुवातीला कमी असलेला आकडा आता 43 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीतील पैसे अशाप्रकारे बोगस लाभार्थ्यांनी उडविले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना पात्र असताना सुद्धा मिळालेली सर्व रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान योजना 13 व्या हप्त्याची अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; चेक करा आपले नाव

पैसे परत न केल्यास कारवाई होणार:

जे बोगस लाभार्थी या pm kisan scheme अंतर्गत आढळून आलेले आहेत आता त्यांची ओळख पटवून झाल्यानंतर अशा लाभार्थ्यांकडून वसुली सुरू करण्यात येत आहे. या बोगस लाभार्थ्यांकडून वसुली करण्याची निर्देश हे देण्यात आलेले आहे. त्या भागातील कृषी विभागाच्या मार्फत या बोगस लाभार्थ्यांकडून वसुली करण्यात येणार असून पैसे परत न दिल्यास त्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्या ठिकाणचे कृषी संचालक अनिल वर्मा यांनी हा प्रकार ऑनलाईन नोंदणी मुळे झाल्याची आढळून आल्याची सांगितलेली आहे.

कापूस बाजार भाव पुन्हा 12 हजार वर जाणार? जाणून घ्या पुढील 2 महिने काय अवस्था होणार कापसाची

अपात्र शेतकऱ्यांना मिळाल्या नोटीस:

ज्या पात्र शेतकरी असून सुद्धा लाभ मिळवत होते अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वगळण्यात आलेले असून अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या अपात्र शेतकऱ्यांना पुढील लाख मिळणार तर नाहीच परंतु जिल्हा मिळवला आहे ते सुद्धा परत द्यावा लागणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!