शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 12 करोड शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची अखेर तारीख ठरलेली आहे. मित्रांनो आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे बारा हप्ते वितरित झालेल्या असून पीएम किसान योजनेच्या त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्याची माहिती देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी Pm Kisan 13 Instalment संदर्भात ही माहिती दिलेली आहे.
मित्रांनो आतापर्यंत संपूर्ण देशभरातील पीएम किसान योजनेच्या 11.50 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची 12 हप्ते वितरित करण्यात आलेली आहे. तसेच अनेक शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत तेरावा हप्ता कधी येणार याच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळण्यासाठी जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाही. Pm kisan योजनेची अधिकृत आणि फिक्स तारीख जाहीर झालेली आहे.
पी एम किसान योजनेला 4 वर्षे पूर्ण:
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेला सुरू करून चार वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्या चार वर्षांमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील अनेक लाभार्थ्यांनी लाभ मिळवलेला आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत चार वर्षात 12 हप्त्यांची वितरण करण्यात आलेले आहे. आता पी एम किसान योजनेला चार वर्षे पूर्ण झालेले असल्यामुळे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे.
पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता कधी मिळणार? Pm kisan yojana 13th installment date fix
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना 27 फेब्रुवारी 2023 ला सोमवार या दिवशी मिळणार आहे. मित्रांनो आपल्या देशाचे कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची दोन हजार रुपयांची पुढील किस्त 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हँडल वर दिलेली आहे.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दिवशी तेरावे हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे.
दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक प्रकारचे बदल केलेले आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेले असून पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता केवळ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पी एम किसान योजना 13 व्या हप्त्याची अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; चेक करा आपले नाव
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही तसेच त्यांचा अर्ज चुकलेला नाही किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या माहितीमध्ये कशाचीही गडबड नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता मिळणार आहे.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता किती शेतकऱ्यांना मिळणार?
मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत 11.50 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत बारा हप्त्याची वितरण झालेले असून पी एम किसान योजनेच्या पुढील तेरावे हप्त्याचे दोन हजार रुपये जवळपास देशभरातील बारा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.