प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही? तुम्हाला घरकुलाच्या यादीतून वगळले! अशी करा तक्रार; लगेच घरकुल मिळेल | PM Awas Yojana complaint

मित्रांनो देशातील गरीब कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर बांधून नाहीत, अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत असते. दरवर्षी या योजनेअंतर्गत नवीन याद्या जाहीर होत असतात. नवीन लोकांचा नवीन यादीमध्ये समावेश करून त्यांना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. परंतु जर तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत घरकुल मिळाले नसेल तर, आता Pm Awas Yojana complaint कशी करायची? या Gharkul Yojana complaint संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या मार्फत प्रत्येक गरीब कुटुंबांकरिता राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे PM Awas Yojana होय. केंद्र शासनाने ही योजना 2015 पासून आपल्या देशात सुरू केलेली आहे. परंतु अजूनही असे अनेक गरीब कुटुंबे आहेत, जे Gharkul योजने अंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांना अजून पर्यंत घरकुल मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना आता काय करायचे? आपल्याला घरकुल मिळणार की नाही? अशी अनेक प्रश्न पडत असतात.

 

अनेक जणांना घरकुल मिळत नसल्यास पुढील प्रक्रिया काय करायची या संदर्भात माहिती नसते. माहितीच्या अभावी वर्षानुवर्षी होतात परंतु गरीब पात्र लाभार्थ्यास घरकुल मिळत नाही. अनेक वेळा गावातील राजकारण किंवा इतर गोष्टींमुळे पात्र असून सुद्धा अनेक जणांना लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण घरकुल मिळवण्यासाठी तक्रार कशी करायची? या Gharkul Yojana Complaint संदर्भात विस्तृत माहिती खाली जाणून घेत आहोत.

 

 

पीएम आवास योजना अंतर्गत तक्रार कशी करायची? How to complain under PM Awas Yojana?

मित्रांनो जर तुम्हाला अजून पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मिळाले नसेल, तर खालील दोन प्रकारे तुम्ही तक्रार करू शकतात.

 

1. घरकुल योजनेची ऑफलाईन तक्रार कशी करायची? How to complain about Gharkul Yojana offline?

मित्रांनो जर तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला घरकुलाच्या यादी मधून वगळण्यात आलेले असेल, तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील तुमची तक्रार नोंदवू शकतात. जर तुम्हाला पीएम आवास योजनेची ऑफलाइन तक्रार करायची असेल तर विहित नमुन्यातील तक्रारीचा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तसेच पंचायत समितीमध्ये करता येतो. तुम्ही घरकुल योजनेची ऑफलाइन तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे करू शकतात.

घरकुल यादी 2023 जाहीर; अशी पहा सर्व जिल्ह्यांची नवीन घरकुल यादी

2. घरकुल योजनेची ऑनलाईन तक्रार कशी करायची?How to complain about Gharkul Yojana online?

मित्रांनो पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल न मिळाल्याची ऑनलाईन तक्रार देखील आपल्याला करता येते. पीएम आवास योजनेची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार करावी लागेल. तसेच तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन वरून सुद्धा तुमची तक्रार दाखल करू शकतात.

 

घरकुल योजना ऑनलाइन तक्रार येथे करा

 

वरील प्रकारे तुम्ही वरील लिंक वरून ऑनलाईन तक्रार देखील दाखल करू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत घरकुल मिळाले नसेल तर ऑफलाइन पद्धतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणे अतिशय सोपे जाईल.

शबरी आवास योजना अंतर्गत 93288 घरकुल वितरित होणार; नवीन निर्णय जाहीर, कुणाला मिळेल लाभ? जाणून घ्या!

घरकुल योजना तक्रार निवारण:

मित्रांनो घरकुल योजना अंतर्गत घरकुलाची यादीतून वगळल्याची किंवा घर न मिळत असल्याची तक्रार आपण वरील प्रकारे करू शकतो. या योजनेअंतर्गत ऑफलाईन किंवा ऑनलाईन कोणत्याही प्रकारे तक्रार केल्यानंतर 45 दिवसाच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते.

Leave a Comment

error: Content is protected !!