शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन टाकण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. या पाईपलाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकरी बांधव 80 टक्के अनुदानावर पाईपलाईन करू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन असणे खूप महत्त्वाचे असून हीच बाब लक्षात घेता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या Pipeline Anudan Yojana Maharashtra अंतर्गत करावयाची अर्जाची संपूर्ण प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. राज्यात शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजना तसेच ठिबक सिंचन योजना व तुषार सिंचन आणि आता Pipeline Anudan Yojana Maharashtra उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घ्यावे परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफा वाढेल व शेतकरी स्वतः समृद्ध होईल.
मित्रांनो केंद्र शासनाचे अंतर्गत राज्यात राज्य पुरस्कृत महाडीबीटी शेतकरी योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी शेतकरी पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना एकाच ठिकाणाहून राबविण्यात येत आहेत.
अनुदान किती मिळणार?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी pipeline करण्यासाठी पीव्हीसी pipeline yojana सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकण्यासाठी 80 टक्के पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना स्वतः पाईपलाईन करिता पाईपाचा संच खरेदी करावा लागेल. त्यानंतर अनुदान मागणी करावी लागेल.
मित्रांनो शेतकऱ्यांना pipeline टाकण्यासाठी आवश्यक असणारी पीव्हीसी पाईप शासन 80 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देत आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्जदाराचा अर्ज छाननी करण्यात येईल. या pipeline yojana 2023 Maharashtra अंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची सोडती द्वारे निवड करण्यात येणार आहे.
80% अनुदानावर पाईपलाईन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी येथे अर्ज करा
अर्ज करण्यासाठी अटी व शर्ती:
1. अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा
2. अर्जदाराकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी
3. अर्जदाराने यापूर्वी पाईपलाईन योजनेचा लाभ मिळवलेला नसावा
4. अर्जदाराकडे जलसिंचनाचा स्त्रोत उपलब्ध असावा
वरील अटी व शर्तींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
पाईपलाईन टाकण्यासाठी 80 टक्के अनुदान मिळविण्यासाठी येथे अर्ज करा
आवश्यक कागदपत्रे:
मित्रांनो जर तुम्ही महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. अर्जदारांची आधार कार्ड
2. अर्जदाराच्या शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
3. अर्जदाराची पॅन कार्ड
4. पूर्व संमती पत्र
5. पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र
पाईपलाईन टाकण्यासाठी 80 टक्के अनुदान मिळविण्यासाठी येथे अर्ज करा
वरील कागदपत्रे असल्यास आपण पाईपलाईन करिता 80 टक्के अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.