शेतकरी मित्रांनो तुमच्या करिता एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर प्राप्त झालेली आहे. आता शेतकरी बांधवांना बँकेकडून पीक कर्ज मिळविण्याकरिता कोणत्याही प्रकारची अट लावण्यात येणार नाही. पीक कर्ज मिळण्याकरिता सिबिल स्कोर ची असणारी अट सहकार आयुक्त यांच्यामार्फत रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता Pik Karj मिळू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सुलभ व अतिशय जलदपणे कर्ज मिळणार आहे.
शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना Pik Karj मिळवायची झाल्यास बँकेकडून अनेक प्रकारच्या जाचक अटी या लागू करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी पिक कर्ज मिळविण्यापासून वंचित राहत होते. तर काही शेतकरी अनेक प्रकारच्या जाचक अटी असल्यामुळे पीक कर्ज सुद्धा घेत नव्हती. त्यामुळे आता pik karj मिळण्याकरिता असणारी सिबिलची अट ही रद्द करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची या जाचक अटी पासून मुक्तता झालेली आहे.
सर्वात महत्वाची बातमी, खरीप पिक विमा 2022 खात्यात जमा होण्यास सुरुवात
मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पत्र पाठवून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी असणारी सिबिल स्कोर ची अट रद्द करण्याची आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळून अधिक सोपे होणार आहे तसेच आता या आदेशामुळे कोणतीही राष्ट्रीयकृत बँक किंवा सहकारी किंवा इतर बँका शेतकऱ्यांना सिबिल स्कोर ठरवून कर्ज देणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी सिबिल स्कोर बंधनकारक नसल्याबाबत आदेश जाहीर:
मित्रांनो महाराष्ट्र शासनाला विधिमंडळातील मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात आलेले होते की आपल्या राज्यातील काही बँका त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँका तसेच व्यापारी बँका शेतकरी बांधवांकडून अल्पमुदती पीक कर्जाकरिता कर्ज वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांचा असलेला सिबिल अहवाल विचारात घेत होत्या. त्यामुळे जर शेतकरी बांधवांचा सिबिल स्कोर कमी असल्यास किंवा खराब असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचण जात होती.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36,000 रू नुकसान भरपाई; शासन निर्णय जाहीर
तसेच रिझर्व बँकेच्या निर्देशनानुसार शेतकऱ्यांकडून तिकीट कर्जाकरिता सिबिल स्कोर चे बंधन नाही. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर न मागण्याची आदेश सहकार आयुक्तांनी दिल्यामुळे अनेक शेतकरी आता सुलभ रीत्या peek karj मिळवू शकणार आहे.
त्यामुळे आता राज्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँका तसेच व्यापारी बँका या शेतकरी बांधवांना पीक कर्ज घेताना सिबिल स्कोर ची मागणी करणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांकरिता ही एक महत्त्वाची बातमी आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांची पिके कर्ज लवकर मंजूर सुद्धा होणार आहे. पिक कर्जा संदर्भातील ही छोटीशी Pik Karj Update महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.