सोलापूर मध्ये एका शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातील दहा पोते कांदा बाजार समितीमध्ये विकण्यासाठी नेला होता. त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा कांदा 512 किलो भरला आणि त्या शेतकऱ्याला कांद्याचे भाव घसरलेले असल्यामुळे केवळ दोन रुपयाचा चेक सर्व खर्च वजा करून मिळालेला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. ही घटना कुठली आहे तसेच शेतकऱ्यांना फक्त 2 रुपयांचा चेक कसा काय मिळाला, या Onion Farmer Update संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नेमकं प्रकरण काय घडलं?
सोलापूर मधील राजेंद्र चव्हाण या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा बाजार समितीमध्ये विकण्यासाठी नेला होता. त्यांच्या कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला होता. या शेतकऱ्याचा कांदा 512 किलो इतका भरला, त्यामुळे एक रुपये प्रति किलो कांद्याच्या दराप्रमाणे त्या शेतकऱ्याला एकूण कांद्याचे बिल 512 रुपये झाले. त्यामध्ये हमाली तसेच तोलाई आणि मोटार गाडी यांचा खर्च 509 रुपये आणि इतर एक रुपयांचा खर्च वजा करून 510 रुपये एकूण 512 रुपयाच्या बिल मधून वजा करण्यात आले. त्यामुळे आता शिल्लक फक्त 2 रुपये राहिले होते.
त्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कांद्याच्या बिलाची दोन रुपये चेकच्या माध्यमातून दिली. त्यामुळे 512 किलो कांद्याचे केवळ दोन रुपये त्या शेतकऱ्याला मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा झालेली आहे. तसेच बळीराजाची अशी थट्टा आणि शेतकऱ्यावर असणारा आसूड यांवरून शेतकऱ्यांची दिवस कसे असतील याचे चित्र स्पष्ट होत आहे.
कधी व कसे घडले प्रकरण
मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र चव्हाण या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील दहा पोते कांदा विकण्यासाठी बाजार समितीमध्ये नेला होता. त्या शेतकऱ्याने 512 किलो कांदा विकला, तेव्हा त्या शेतकऱ्यांनी विकलेला कांदा याची लिलाव पट्टी तयार करण्यासाठी त्या व्यापाऱ्याने पावती पुस्तक काढल्यानंतर त्या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करून केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्याचा व शेतकऱ्याला मिळालेल्या दोन रुपयांच्या चेकचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला.
त्यामुळे शेतकऱ्यांची असणारे हे दुःख तसेच शेतकऱ्यांची व्यथा ही जगासमोर आलेली आहे. शेतकऱ्यांना अनेक वेळेस अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करून 512 किलो कांद्याची केवळ दोन रुपये मिळत असतील तर त्या शेतकऱ्यांनी त्यावर केलेला हजारो रुपयांचा खर्च कोण देणार.
व्यापाऱ्याचे निलंबन करण्यात आले
त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या संबंधित व्यापाऱ्यांनी रोख पैसे न देता दोन रुपयांचा चेक दिल्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आलेले आहे. बाजार समितीचे सचिव यांनी त्या अडत वापरायला पंधरा दिवसाचे निलंबन करण्याचा आदेश काढलेला आहे. जर त्या व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला चेक न देता कांद्याची पट्टी रोख स्वरूपात दिली असती तर त्याला कोणत्याही प्रकारच्या निलंबनाला सामोरे जावे लागले नसते.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कसं जगायचं असा प्रश्न विविध शेतकरी बांधव तसेच राजकीय पूढार्यांकडून करण्यात येत आहे. या निमित्ताने का होईना Kanda Utpadak Shetkari ची असलेली ही अवस्था आज जगासमोर आलेली आहे.