मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांवर तसेच राज्यातील जनतेवर कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती झाल्यास राज्य शासनाच्या मार्फत तसेच केंद्र शासनाच्या मार्फत वेळोवेळी नुकसान भरपाई वितरित करण्यात येत असते. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी नुकसान भरपाई चे निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना किंवा राज्यातील कोणत्याही नुकसानग्रस्त व्यक्तीला त्याच्या नुकसानी प्रती नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी नुकसान भरपाईच्या अस्तित्वात असणाऱ्या निकषानुसार नुकसान भरपाई चे वाटप करण्यात येत असते.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती आणि सततचा पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तसेच राज्यातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकांच्या शेतातील पीक नष्ट झाले होते तसेच अनेकांची घरे पडली होती, अनेक लोकांची जनावरे दगावली होती. मोठ्या प्रमाणात जीवित वित्त हानी झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने अस्तित्वात असणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार राज्यातील जनतेला नुकसान भरपाई चे वाटप केले होते. आता Nuksan Bharpai Nidhi Maharashtra Increase झाल्यामुळे त्या नुसार nuksan bharpai वाटप करण्यात येत आहे.
परंतु नुकसान भरपाई चे पूर्वी अस्तित्वात असलेले निकष हे बदलून नवीन निकषात नवीन पद्धतीने नुकसान भरपाईचा समावेश करावा अशी वारंवार लोकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे नुकसान भरपाईच्या निकषात नुकसान भरपाईची रक्कम वाढवावी तसेच नुकसान भरपाई चे किचकट निकष काढून त्याला सुलभ करावे यासाठी राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे निकषात मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली होती. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई वाटपाच्या प्रक्रियेमध्ये तसेच निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात अनेक सुधारणा करण्यात आलेले असून आता शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एसडीआरएफ च्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत.
नुकसान भरपाई वितरणाचे सुधारित दर खालील प्रमाणे आहे:
Nuksan bharpai वितरणाच्या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या या सुधारणा तसेच बदल 2025 ते 2026 पर्यंत लागू असतील.
1. मृतांच्या कुटुंबीयांना पूर्वी 4 लाख रुपये मदत देण्यात यायची ती मदत आता इथून पुढे सुद्धा 4 लाख रुपये देण्यात येणार आहे. जर एखाद्याला 40 ते 60 टक्के पर्यंत अपंगत्व आल्यास पूर्वी 59 हजार 100 रुपये नुकसान भरपाई मिळायची ती आता वाढवून 74 हजार रुपये करण्यात आलेली आहे. 60 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 2 दोन लाख रुपये वितरित करण्यात यायचे, आता 2 लाख 50 हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे.
2. जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास पूर्वी 12 हजार 700 रुपये देण्यात यायचे आता 6 हजार रुपये मिळणार आहे. जर जखमी व्यक्ती एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये असल्यास पूर्वी 4300 रुपये मिळायचे आता 5400 रुपये मिळणार आहे.
3. सकल भागामध्ये घर पूर्णतः नष्ट झाल्यास पूर्वी 95 हजार 100 रुपये मिळायचे आता 1 लाख 20 हजार रुपये मिळणार आहे. दुर्गम भागातील घरांसाठी आता एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहे.
4. जर पक्के घर अंशतः पडल्यास पूर्वी पाच हजार दोनशे रुपये मिळायचे आता हे रक्कम वाढवून 6500 करण्यात आलेली आहे.
5. जर कच्चे घर अंशता पडल्यास पूर्वी तीन हजार दोनशे रुपये मिळायचे आता ही रक्कम वाढवून 4000 रुपये करण्यात आलेली आहे.
6. जर झोपडी अंशतः पडल्यास पूर्वी चार हजार शंभर रुपये मिळायचे आता ही रक्कम वाढवून आठ हजार रुपये करण्यात आली आहे.
7. जर नुकसानीमुळे एखाद्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाल्यास पूर्वी तीस हजार रुपये मिळायचे आता हे रक्कम वाढवून 37 हजार पाचशे रुपये करण्यात आलेली आहे.
8. जर नुकसानीमुळे डुक्कर किंवा मेंढी किंवा बकरी अशा जनावरांचा मृत्यू झाल्यास पूर्वी तीन हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम वाढवून चार हजार रुपये करण्यात आलेली आहे.
9. कुक्कुटपालनामध्ये पूर्वीच्या रकमेनुसार शंभर रुपये प्रति कोंबडी इतका दर होता आता तर कुक्कुटपालकाला पन्नास रुपये प्रति कोंबडी प्रमाणे पाच हजार रुपये पर्यंत मिळणार आहे.
10. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी पूर्वी 25 हजार रुपये मिळायचे आताही रक्कम वाढवून 32 हजार रुपये करण्यात आलेली आहे.
11. पूर्वी खेचर किंवा गाढव अशा जनावरांचा मृत्यू झाल्यास 16 हजार रुपये मिळायचे परंतु आता नवीन नुकसान भरपाईच्या निकषानुसार 20 हजार रुपये मिळणार आहे.
नवीन नियमानुसार खालील प्रमाणे शेत जमिनीची नुकसान भरपाई मिळणा
1. यापूर्वी जिरायत पिकांच्या नुकसानी करिता शासनाच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी 6 हजार 800 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळायची परंतु आता 8 हजार 500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.
2. आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी यापूर्वी 13 हजार 500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळायची आता नवीन नियमानुसार 17 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नाही Shetkari Nuksan bharpai मिळणार आहे.
3. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी करिता यापूर्वीच्या निकषानुसार 18 हजार रुपये प्रति हेक्टर मिळायची परंतु आता नवीन नियमानुसार प्रति हेक्टर 22 हजार 500 रुपये मिळणार आहे.
4. शेत जमिनीच्या नुकसानेकरिता बारा हजार दोनशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळायची परंतु आता नवीन नियमानुसार 18 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे.
5. जर शेत जमिनीचे नुकसान दरड कोसळून किंवा जमीन खरडून गेल्यामुळे झाल्यास पूर्वी 37 हजार पाचशे रुपये मिळायचे आता नवीन नियमानुसार 47 हजार रुपये मिळणार आहे.
नवीन नियमानुसार मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार:
मत्स्य व्यवसायामध्ये बोटीच्या अंशतः दुरुस्ती करण्यासाठी पूर्वी चार हजार शंभर रुपये मिळायचे आताच्या नवीन नियमानुसार सहा हजार रुपये मिळणार आहे. अंशता बाधित जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी पूर्वी 2100 रुपये मिळायचे आता चार हजार शंभर रुपये मिळणार आहे.
जर एखाद्या मत्स्य व्यवसायिकाची बोट पूर्णतः नष्ट झाल्यास त्याला पूर्वी 9600 रुपये मिळायचे आता यामध्ये वाढ करून 15 हजार रुपये करण्यात आलेली आहे. तसेच नवीन नियमानुसार पूर्वी पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मिळणारी रक्कम 2600 रुपये होती ती आता बदलून चार हजार रुपये करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या रकमेमध्ये केलेल्या निकषातील बदलानुसार सुधारित दराला मान्यता देण्यात आलेली असून आता Nuksan bharpai च्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे नवीन सुधारित नियमानुसार नुकसानग्रस्त व्यक्ती ला नुकसान भरपाई चे वाटप होणार आहे.