शेळी व मेंढी, गाय व म्हैस तसेच कुकूटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान नवीन अर्ज सुरू; राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 सुरू | National Livestock Mission 2023

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 हे राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. मित्रांनो या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन आणि गाय व म्हैस पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांना व पशुपालकांना 50 लाख रुपये अनुदान हे केंद्र शासन वितरित करीत आहे. या National Livestock Mission योजने अंतर्गत करावयाचा अर्ज प्रक्रिया तसेच संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये केंद्र शासनाच्या मार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 हे राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या pashu samvardhan abhiyan अंतर्गत राज्यातील पशुपालकांना गाय व म्हशी तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालनाची गट वाटप करण्यात येत असते. याकरिता संबंधित अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून त्याचा प्रकल्प अहवाल ऑनलाईन सादर करावा लागतो. त्यानंतर तुम्ही केलेला अर्ज मान्य झाल्यानंतर पन्नास टक्के अनुदान राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मिळते तर उर्वरित पन्नास टक्के अर्जदारांना स्वतः उभारावे लागते किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात मिळवावे लागते.

 

खालील योजनांसाठी मिळेल 50 लाख रुपये पर्यंत अनुदान

1. शेळी व मेंढी पालन योजना(sheli mendhi palan yojana)

2. गाय व म्हैस पालन गट वाटप योजना(gay mhais palan yojana)

3. कुकुट पालन योजना(kukkut palan yojana)

4. वराह पालन योजना

 

मित्रांनो वरील चार प्रकारच्या योजनांकरिता तुम्हाला पन्नास लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. तुमच्या प्रकल्प अहवालानुसार म्हणजेच जेवढी तुमची योजना मोठी असेल म्हणजेच तुम्ही जेवढ्या प्रमाणात पशुंची खरेदी करणारा असाल तेवढ्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते.

अर्थसंकल्प 2023 मध्ये शेतकरी बांधवांसाठी जबरदस्त घोषणा; अनेक योजना, आयकरात सूट व बरच काही!

अर्ज कसा व कुठे करायचा? How to Apply for NLM Scheme?

मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या वरील चार पैकी कोणत्याही pashu samvardhan अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून संबंधित अर्जदारांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

या योजनेअंतर्गत आत्ताच ऑनलाइन अर्ज येथे करा

 

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुद्धा राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 50 लाख रुपये अनुदान मिळण्याकरिता अर्ज करू इच्छित असाल तर वरील वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर येथे क्लिक करून जा

 

योजनेस संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या(Rashtriya pashudhan abhiyan) वेबसाईटवर विस्तृत माहिती मिळू शकतात. तसेच तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी देखील या योजनेसंदर्भात अधिक माहिती विचारू शकतात.

2 thoughts on “शेळी व मेंढी, गाय व म्हैस तसेच कुकूटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान नवीन अर्ज सुरू; राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 सुरू | National Livestock Mission 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!