दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून तब्बल 25 लाख रुपये कर्ज; असा करा ऑनलाईन अर्ज | Nabard Dairy Loan

मित्रांनो राज्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच दुग्ध व्यवसाय करून पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नफा कमवून स्वतःची आर्थिक उन्नती करावी. तसेच शेतकऱ्यांना शेतीबरोबर पूरक व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज वितरित करण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणारं हे 25 लाख रुपये कर्ज कसे मिळवायचे. याकरिता आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती या Dairy Loan Yojana संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने जे शेतकरी गाय व म्हैस पालन करतात अशा शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या पैशातून शेतकरी नवीन पशुंची खरेदी करू शकतात किंवा त्यांचा सुरुवातीचा असणारा व्यवसाय हा विस्तारू शकतात. या कर्जाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय देखील पशुपालक सुरू करू शकतात. शेतकरी पशुपालन हा dairy farming business करून चांगल्या प्रमाणात नफा कमवून त्यांची आर्थिक प्रगती साधून घेऊ शकतात.

 

दुग्ध व्यवसायासाठी कर्ज कोण देणार? Who will give loan for dairy business?

मित्रांनो राज्यात पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढावी तसेच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध मार्गाने जास्तीत जास्त उत्पन्न कमवावे या उद्देशाने नवनवीन योजनांच्या माध्यमातून वेळोवेळी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने नाबार्ड बँकेत मार्फत कर्ज वितरित करण्याची ठरविले आहे.

 

मित्रांनो नाबार्ड ही एक शेतकऱ्यांची बँक समजल्या जाते अनेक वेळा ही बँक शेतकऱ्यांसाठी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून देत असते. तसेच शासनाच्या माध्यमातून सुद्धा दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना 33% पर्यंत अनुदान मिळणार आहे. नाबार्ड बँकेमार्फत दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

दुग्ध व्यवसाय अंतर्गत 25 लाख रुपये कर्ज मिळवण्याचा अर्ज येथे करा

 

तुम्हाला मिळालेले दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. जर तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडावी लागेल. तसेच तुम्ही दुग्ध व्यवसाय किती पशूंची संख्या खरेदी करून सुरू करणार आहात, याचा सुद्धा संपूर्ण तपशील तुम्हाला सादर करावा लागेल.

दुग्ध व्यवसायासाठी तब्बल 25 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

 

दुग्ध व्यवसायासाठी 25 लाख रुपये कर्ज कोण मिळवू शकतो?

शेतकरी मित्रांनो नाबार्ड बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणारे 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे वैयक्तिक शेतकरी तसेच स्वयंसेवी संस्था किंवा वैयक्तिक उद्योजक किंवा सहकारी शेतकरी संस्था, शेतकरी गट तसेच संघटित क्षेत्रातील कंपन्या यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शासन शेतकऱ्यांना या कर्जाच्या रकमेमध्ये 30 टक्के पर्यंतचा अनुदान उपलब्ध करून देत आहे.

दुग्ध व्यवसायासाठी तब्बल 25 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इथे पहा

या योजनेअंतर्गत मिळणारं कर्ज हे तुम्ही सुरू करत असलेल्या दुग्ध व्यवसायानुसार देण्यात येणार आहे. तसे तुमचा प्रकल्प अहवाल सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!