दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेकरिता 10 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार; महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना होईल फायदा! | Maharashtra State Board Exam

विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे. आणि यावर्षी महाराष्ट्र उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्यातच महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा करिता दहा मिनिटे चा अतिरिक्त वेळ देण्याची महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी जे यावर्षी Maharashtra State Board Exam देत आहेत, अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मार्फत यावर्षी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरीता महत्त्वाची बातमी आलेली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तसेच पालकांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला मान्य करत महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपर करिता निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पेपर साठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे एक्स्ट्रा मिळत असल्यामुळे याचा फायदा घेऊन hsc, ssc चे विद्यार्थी जास्त मार्क मिळवू शकणार आहे.

SSC HSC Exam हे लवकरच राज्यात सुरू होत असून या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी सामोरे जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावीची परीक्षा अत्यंत व सर्वात महत्त्वाचे असते. या परीक्षा वरूनच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा दहा मिनिटे मिळणारा अतिरिक्त टाईम त्यांच्याकरिता खूप महत्त्वाचा आहे.

 

यापूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने यापूर्वी कोणता निर्णय घेतला होता?

मित्रांनो यापूर्वी दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका चे आकलन करण्यासाठी निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येत होत्या. परंतु बऱ्याच ठिकाणी दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्यामुळे या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होत्या म्हणजेच पेपर फुटीच्या घटना वाढत होत्या. या घटनेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दहा मिनिटे निर्धारित वेळेच्या पूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला होता.

 

परंतु यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते, जे विद्यार्थी प्रामाणिक होते अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार होता. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डाने विद्यार्थी व पालकांनी केलेली ही मागणी मान्य करत आता निर्धारित वेळेच्या नंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

दहावी बारावी च्या परीक्षेत अत्यंत महत्वाचे बदल; इथे पहा काय केले अत्यंत महत्वाचे बदल

10 मिनिटाचा अतिरिक्त वेळ कसा मिळेल?

यापूर्वी विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेच्या पूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनिटे वेळ देण्यात येत होता. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत हा निर्णय रद्द करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेच्या नंतर 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

 

 

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे नवीन अंतिम वेळापत्रक जाहीर; लगेच पहा टाईम टेबल

 

म्हणजेच जर तुमचा पेपर चा टाइमिंग हा 11 ते 2 वाजेपर्यंत असेल तर तुमचा पेपर हा 11 ते 2.10 पर्यंत असणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

 

दहावी बारावी च्या परीक्षेत अत्यंत महत्वाचे बदल; इथे पहा काय केले अत्यंत महत्वाचे बदल

 

 

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा

मागील दोन वर्षापासून देशभरात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच देशात लागलेल्या लॉकडाऊन मुळे परीक्षा ऑनलाईन घेण्यात आलेल्या होत्या. कोरोना नंतर आता यावर्षी पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!